एक्स्प्लोर
मुंबईतल्या पाच पर्यटकांचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून मृत्यू
पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. सर्व जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

रत्नागिरी : मुंबईतल्या पाच जणांचा रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. सर्व जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एकूण सहा जण आरेवारे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असता पाण्यात गेले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सर्व जण पाण्यात वाहून गेले, मात्र यातील एक महिला बचावली. रेंचर डिसुजा (वय 19), मॅथ्यू डिसुजा (वय 18), केनेथ डिसुजा (वय 54), मोनिका डिसुजा (वय 44) आणि सनोमी डिसुजा (वय 22) अशी मृतांची नावं आहेत. तर रिटा डिसुजा यांना वाचवण्यात यश आलं.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















