25 व्या मजल्यावरुन घेतली उडी, 11 वीत शिकणाऱ्या मुलीनं संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं गोरेगाव हादरलं
मुंबईच्या गोरेगाव (Mumbai Goregaon) पूर्वेत ओबेरॉय स्क्वायर इमारतीमध्ये एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Mumbai : मुंबईच्या गोरेगाव (Mumbai Goregaon) पूर्वेत ओबेरॉय स्क्वायर इमारतीमध्ये शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीने ओबेरॉय स्क्वायर इमारतीच्या A wing मधून 25 वा मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं आहे. आज मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास या मुलीनं आत्महत्या केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून या घटनेबाबत चौकशी सुरु
घटनेची माहिती मिळतात आरे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याच इमारतीमध्ये एका महिन्यापूर्वी एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाने इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. सध्या आरे पोलिसांनी या प्रकरणी ADR दाखल करुन शाळकरी मुलीने एवढं मोठं टोकाचा पाऊल का उचललं असावं? या आत्महत्या मागे काही कारण आहे का? या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Shani Shingnapur News: शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांचं टोकाचं पाऊल, गळ्याला दोर लावला अन्....























