एक्स्प्लोर
Advertisement
मेहतांचा पाय खोलात, झोपड्यांना संरक्षण प्रकरणी अटकेची मागणी
तानसा पाईपलाईनच्या आसपास अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर कारवाई करताना प्रकाश मेहता यांनी अडथळा आणला असा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या घाटकोपर पाईपलाईनवरील झोपडपट्ट्यांना संरक्षण दिल्याचा आरोप करत, मेहतांना अटक करण्याची मागणी याचिकाकर्त्याने हायकोर्टात केली आहे.
घाटकोपर पश्चिम इथल्या तानसा पाईपलाईनच्या आसपास असलेल्या झोपड्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाईला आडकाठी आणणाऱ्या प्रकाश मेहता यांच्याविरोधात वॉरंट न काढता त्यांना अटक करा आणि एफआयआर दाखल करुन चौकशी करा, अशी मागणी याचिकाकर्ते भगवानजी रायानी यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.
तानसा पाईपलाईनच्या आसपास अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर कारवाई करताना प्रकाश मेहता यांनी अडथळा आणला असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मेहता यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण अतिक्रमण विरोधी कारवाईला अडथळा आणला नसल्याचं म्हटलं आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छंती निश्चित?
मेहतांचे प्रतिज्ञापत्र आपण पाहावे आणि त्यानंतर युक्तीवाद करावा, त्यानंतर मेहतांबद्दल नेमकं काय करायचं तो पाहुयात, असं कोर्टाने रायानी यांना सांगितलं. मेहता यांचं प्रतिज्ञापत्र द्यावं असं कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे. मुंबईतील ताडदेवच्या एसआरए घोटाळ्यामुळे, प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. गेल्या चार दिवसांपासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत प्रकाश मेहतांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. संबंधित बातम्या विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्रीमुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement