एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं काम सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट  असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या भूसंपादनाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांना पाचपट मोबदला देऊन विकासाचा महामार्ग म्हणून ज्याचे प्रमोशन केलं जात आहे, त्याच समृद्धी महामार्गाच्या कामाला काही दिवसांपासून सुरवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोठमोठ्या मशिनरी, गाड्या, मोठ्या संख्येने कामगार दाखल झाले आहेत. सपाटीकरण, रस्त्याचे मार्किंग, मशिनरी जोडणे, मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविणे अशा वेगवेगळ्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. तसंच वावी आणि गोंदे या दोन गावांच्याजवळ जंक्शन तयार करण्यात आले आहे. अडीच वर्षात महामार्गाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जलदगतीने कामाला सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा महामार्ग आहे. शिव मडका ते वडपे यादरम्यान महामार्गाचं काम टप्याटप्याने सुरु होणार आहे. नागपूर-मुंबई दृतगती शीघ्र संचार मार्ग या नावे सध्या हा मार्ग ओळखला जात आहे. नाशिकसह राज्यभरातील 10 जिल्ह्यातून या रस्त्याचा मार्ग असेल. नाशिकच्या सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यातच महामार्गाची 101 किलोमीटरची लांबी आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील 26 तर इगतपुरी तालुक्यातील 23 गाव आणि दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं 929.64 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. इगतपुरी तालुक्यात 40 किलोमीटर तर सिन्नरमध्ये 61 किलोमीटर लांबीचा महामार्ग जाणार आहे. 120 मीटर रुंद हा रस्ता असेल. सहा पदरी महामार्गाचा डिझाईन स्पीड लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरू झालं आहे. रस्त्याला कुठेही शार्प टर्न येणार नाहीत, सहज वळण घेता येईल अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा विरोध समृद्धी महामार्गाचे काम सुरु झाल्याच्या सुरवातीलाच वावी गावाजवळील काही शेतकऱ्यांनी एका टप्प्यातील काम बंद पाडलं आहे. परिसरसतील 6 ते 7 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दुशिंगपूर बंधाऱ्याच्यामधून हा महामार्ग जातो. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना बंधाऱ्याला बाधा पोहोचणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र आता भराव टाकून बंधाऱ्यातूनच रस्ता बनविण्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेत काम बंद पाडलं आहे. बंधाऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात त्यांचे निवाडे अद्याप बाकी आहेत, समृद्धी महामार्गाला जमिनी दिलेल्या 100 हून अधिक हेक्टरचा मोबदला अद्याप मिळाला नाही. हा निवाडा पूर्ण होण्याआधीच कामाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget