एक्स्प्लोर
गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत

मुंबई : गिरणी कामगार आणि वासरदारांच्या घरांची सोडत आज जाहीर होणार आहे. सहा बंद गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या 2634 घरांची सोडत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या लॉटरीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल.
भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबिली या गिरण्यांमधील या कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना ही घरं मिळणार आहेत. सहा गिरण्यांचे सहाच कोड असल्याने सोडतीचा कार्यक्रम एक ते दोन तासांतच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
गिरणी कामगारांच्या लढ्याला मोठं यश, 5052 घरांसाठी लवकरच लॉटरी
गिरणी कामगारांसाठी एकूण 5052 घरं राज्य सरकारने मागील महिन्यात गिरणी कामगारांना हक्काचं घर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बंद गिरण्यांच्या जागेवर तब्बल 2 हजार 634 घरं तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत 2 हजार 418 अशी एकूण 5 हजार 52 घरं गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. ही घरं 225 चौरस फूटांची असून या घरांसाठी लवकर सोडत काढण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी बंद गिरण्यांच्या जागेवर बांधलेल्या 2634 घरांसाठी आज सोडत निघणार आहे. घरांची किंमत साडे नऊ लाख! या जागेवर बांधलेल्या घरांची किंमत साडे नऊ लाख रुपये असणार आहे. तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत उपलब्ध होणाऱ्या घरांची किंमत 6 लाख रुपये निश्चित केली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
