(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Muharram 2022 : इस्लामिक कॅलेंडरनुसार आजपासून नवीन वर्षाला सुरुवात; जाणून घ्या माहिती
Muharram 2022 : इस्लामिक कॅलेंडरनुसार आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली.
Muharram 2022 : इस्लामिक कॅलेंडरनुसार आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली. संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर मोहरम महिन्याची सुरुवात झाली. मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना आहे. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव याच महिन्यात शोक देखील व्यक्त करतात. आज संध्याकाळ पासून मोहरमची सुरुवात झाली.
इस्लामी कालगणनेचा पहिला मास. मुहर्रमचा शब्दशः अर्थ ‘पवित्र’ असा आहे. 'पवित्र कुराणा'त (9·36–37) संकेतित केल्याप्रमाणे चार पवित्र मासांपैकी (मुहर्रम, शव्वाल, जिल्कद व जिलहज्ज) मुहर्रम हा एक पवित्र मास होय. मुहर्रम पहिल्या तारखेपासून सुरू होऊन दहा दिवसापर्यंत चालतो. मुहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशूरा म्हणतात.
शिया लोक सुतकाचे दिवस म्हणून हे दिवस पाळतात. कारण मुहंमद पैगंबराचे नातू हजरत इमाम हुसैन हे आशूरेच्या दिवशी हुतात्मे झाले. त्याची दुःखद स्मृती म्हणून पहिले नऊ दिवस ताजिये किंवा ताबूत बसवून ते दहाव्या दिवशी विसर्जित करतात. हजरत अली, हजरत हसन आणि हजरत हुसैन या हुतात्मात्रयीच्या हौतात्म्यास इस्लामी इतिहासात असाधारण महत्त्व आहे.
आशूरा मुहर्रमचा पवित्र दहावा दिवस म्हणून आणि मुहर्रम हा सृष्टी उत्पत्तीचा महिना म्हणून सुन्नी मुसलमानांना पवित्र वाटतो. मुहंमद पैगंबरांनी आपल्या अनुयायांना आशूरा या दिवशी उपवास करण्यास आणि प्रार्थना करण्यासंबंधी आदेश दिला. तसेच या दिवशी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, डोळ्यात सुर्मा लावणे, अत्तर-सुगंध लावणे हे श्रेयस्कर असल्याचे सांगितेले आहे. शत्रूंशी शांततेचा तह करणे, सत्संग राखणे, अनाथांना आश्रय देणे आणि दानधर्म करणे यासंबंधीही त्यांनी आज्ञा केली. प्रेषितांनी आशूरेच्या उपवासाची विशेषेकरून महती सांगितलेली आहे.
महत्वाच्या बातम्या :