महावितरणचा कर्तव्यदक्ष कर्मचारी; लग्नात उखाणा घेत ग्राहकांना वीज भरण्याचं आवाहन
कोल्हापूरचे महावितरणचे कर्मचारी मंगेश कांबळे यांनी आपल्या लग्नात उखाणा घेताना वीज बिल भरा हा संदेश मजेशीर पद्धतीने दिला आहे.
मुंबई : कोरोना काळात जास्त वीज बिल आल्याने ग्राहक त्रस्त आहे तर महावितरण उरलेल्या थकबाकीमुळे ते संकटात आहेत. अशा वेळी महावितरण सध्या वीज बिल वसुली करत आहे. यावरून राजकारण ही तापलं अस असलं तरी एक महावितरणचे कर्मचारी मात्र आपल्या कामात किती कर्तव्यदक्ष आहेत याचं उदाहरण समोर आले आहे. लग्नातील उखाणा घेणारा एका नवरदेवाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कोल्हापूरचे महावितरणचे कर्मचारी मंगेश कांबळे यांनी आपल्या लग्नात उखाणा घेताना वीज बिल भरा हा संदेश मजेशीर पद्धतीने दिला आहे. त्याची दखल थेट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली त्यांनी ट्विट करता या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
याला म्हणतात कर्तव्यदक्ष कर्मचारी !!! pic.twitter.com/tOpTUSeOnj
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) February 24, 2021
राज्यात सध्या नोकर भरतीकडे अनेकजण डोळे लावून बसले आहेत. भरती कधी होणार असा प्रश्न एक व्यक्तीने मंत्र्यांचे नाव घेत त्यांना भरती करा असे विचारलं तेव्हा मंत्र्यांनी देखील फिरकी घेत जरा धीर धरा म्हणून मजेशीर उत्तर दिलं. एकूणच सध्या वीज बिल असो किंवा नोकर भरती सोशल मीडियावरून मंत्र्यांना देखील ट्रोल केलं जातं. तेव्हा मंत्री देखील त्याला उत्तर देत आहे असेच चित्र आहे.
कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरु केलंय. राज्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महत्वाच्या शहरांत भाजपने आंदोलन सुरु केलंय. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकले होते. लॉकडाऊन काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला होता. त्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.