एक्स्प्लोर
Advertisement
MPSC चा निकाल जाहीर, नांदेडचे शिवाजी जाकापुरे राज्यात अव्वल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 7 जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा (एसटीआय) निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) राज्यातून अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर डोंबिवलीची श्रुती कानडे ही राज्यात दुसरी आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 7 जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा (एसटीआय) निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार हे पहिले आले आहेत. शिवाय महिला प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर या पहिल्या आल्या आहेत.
शिवाजी जाकापुरे यांना 156, तर प्रमोद केदार यांना 148 गुण मिळाले आहेत. तसेच, बंडगर यांना 141 गुण मिळाले आहेत. परीक्षार्थ्यांना त्यांचा निकाल एमपीएससीच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या परीक्षेच्या निकालातून 251 उत्तीर्ण विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या मुख्य परीक्षेला 4 हजार 430 विद्यार्थी बसले होते. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या निकालातून शिफारशीसाठी निवडण्यात न आलेल्या परीक्षार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांना दहा दिवसात अर्ज करता येईल, असंही आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांसाठी गेल्या वर्षी संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातून तीन लाख 30 हजार 909 विद्यार्थी बसले होते. यातून 4 हजार 430 उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी करण्यात आली.#MPSC च्या #विक्रीकर_निरीक्षक मुख्य परीक्षा- २०१७ चा निकाल जाहीर. राज्यात नांदेडचे शिवाजी जाकापुरे प्रथम तर सांगलीच्या श्रीमती शितल बंडगर महिलांमध्ये प्रथम -- स्पर्धापरीक्षा/नोकरीविषयक घडामोडींसाठी ' #महासंवाद : महाराष्ट्र शासन' टेलिग्राम चॅनल JOIN करा..https://t.co/Rsk4nJFWXO pic.twitter.com/iGB97qkAHm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement