(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परीक्षार्थींसाठी खुशखबर... MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा
परीक्षार्थींना आता एमपीएससीने पूर्वीप्रमाणेच त्या-त्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा एमपीएससीकडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधीची घोषणा आज करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं आहे.
वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससीच्या धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी, इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी असा नियम मर्यादित करण्यात आली होता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती. आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत.