MPSC : चार उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी; आयोगाने दिले 'हे' कारण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पहिल्यांदाच चार उमेदवारांना परीक्षा देण्यास बंदी आणली आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) चार उमेदवारांवर परीक्षा देण्यासाठी कायमस्वरूपी बंदी आणली आहे. वेगवेगळ्या कारणांनी या उमेदवारांना आयोगाच्या परीक्षा देण्यास मनाई करण्यात आलीय. आयोगाने पहिल्यांदाच अशी भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यामध्ये या चार उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी कायमस्वरुपी बंदी आणली आहे. आयोगाकडून खालील उमेदवारांवर कायमस्वरूपी बंदी आणण्यात आली आहे.
1. नागरे शुभम भारत
2. रामकिशोर धनराज पवार- बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे.
3. मनोज रतन महाजन- परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे.
4. विठ्ठल भिकाजी चव्हाण- समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे.
आयोगाकडून खालील उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे:-१.नागरे शुभम भारत व २.रामकिशोर धनराज पवार-बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे. ३.मनोज रतन महाजन-परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे. ४.विठ्ठल भिकाजी चव्हाण-समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 31, 2022
एमपीएससीकडून आता सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. एमपीएससीविरोधात सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या कमेंट्स आणि इतर गोष्टींवर आता कारवाई करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. या आधी सोशल मीडियावरुन एमपीएससीने अशा प्रकारच्या कारवाईचे समर्थनही केलं आहे.
पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
दरम्यान, एमपीएससी पूर्व परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 6,567 उमेदवारांची निवड झाली आहे. आता हे उमेदवार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा देतील. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. एकूण 290 पदांच्या निवडीसाठी ही परीक्षा आयोजित केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 6567 उमेदवारांची झाली निवड; 'या' दिवशी होणार मुख्य परीक्षा
- MHADA परीक्षेत गैरप्रकार, एमपीएससी समन्वय समितीचा आरोप, CCTV फूटेज समोर
- MPSC : एमपीएससीच्या गट क वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 3 एप्रिलला होणार परीक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha