एक्स्प्लोर

महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे; उदयनराजे भोसले यांची मागणी 

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून देखील राज्यपालांवर कोणतीही कारवाई झाली नाही, यावरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. नकुतीच त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचे विचार दिले.  आज सर्वच पक्ष महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करतात. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करतो असं सांगतिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव फक्त राजकारणासाठी घेतले जात आहे. परंतु. त्यांच्याबाबत कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर कोणाला राग कसा येत नाही. महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते त्यावेळी देखील यांना कोणालाच राग का येत नाही. महाराजांची अशी प्रतिमा तयार केली तर पुढच्या पिढीला महाराज असे होते असेच वाटेल. आता जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे  भोसले यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबाबत खंत व्यक्त केली. राजकीय स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत. परंतु, त्यांच्याबाबत गलिच्छ कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबाबत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. 

राज्यपालांच्या वक्तव्यावरून उदयनराजे आज खूपच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. देशात सध्या सुरू असलेलं विकृतीकरण थांबवलं पाहिजे. शिवाजी महाराजांबाबत जर कोणी वेडं वाकडं बोलत असेल आणि राजकीय नेते शांत बसत असतील, शिवाय अशा लोकांवर कारवाई करत नसतील तर महाराजांचं नाव घेण्याचा कोणाला अधिकार नाही, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी घेतली. 

उदयनराजे भावूक 
दरम्यान, उदयनराजे पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक भावूक झाले. छत्रपतींचा अवमान होत असल्याचे पाहून मनाला वेदना होतात. महाराजांचा अपमान होत असेल तर कोणाच्याही डोळ्यात अश्रु येणारच. शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर इथं आलेल्या प्रतेकाची हीच भावना आहे. मी हतबल आहे असं समजा. कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. असे सांगताना ते भावूक झाले. जर महाराजांची प्रतिमा मलिन होत असेल आणि प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर विमानतळांना महाराजांची नावं का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करायची? असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी उपस्थित केला.   

महत्वाच्या बातम्या

Governor Bhagat Singh Koshyari: मोठी बातमी! राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदमुक्त होण्याचे संकेत 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget