फोटो व्हायरल करणाऱ्यांना श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले आता घरी बसण्याचीही चोरी
MP Shrikant Shinde : गेली अडीच वर्षात हा सगळा खुर्चीचा खेळ झाला होता. जिकडे तिकडे खुर्ची दिसत होती. आज माझी खुर्ची दिसली, ती देखील घरातली.
MP Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खुर्ची बाबत आज विरोधकांनी टीका केली होती. याबाबत खासदार शिंदे यांनी आज विरोधकांना टोला लगावला. गेली अडीच वर्षात हा सगळा खुर्चीचा खेळ झाला होता. जिकडे तिकडे खुर्ची दिसत होती. आज माझी खुर्ची दिसली, ती देखील घरातली. काल लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घरी बसलो होतो. त्यांच्या समस्या जाणून घेत होतो, माझ्या खुर्चीच्या मागे जो बोर्ड ठेवला होता तो साहेबांची व्हीसी होती म्हणून ठेवला होता. आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ माझीही खुर्ची विरोधकांच्या डोळ्य़ात खूपू लागली आहे. म्हणचे आत्ता घरी बसण्याचीही चोरी झाली आहे, असे प्रत्युत्तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री अठरा तास काम करतात ते देखील आता विरोधकांच्या डोळ्यात खुपायला लागले. ते इतकं काम कसं करू शकतात? ते कोणतं टॉनिक घेतात? याचं देखील संशोधन सुरू आहे. पुढे बोलताना काही लोक बोलले की दोन दोन मुख्यमंत्री पाहिजे, तो त्यांचा अगोदरचा अनुभव होता. नावाला कोणी कामाला कोणी, नामधारी कोण आणि कामधरी कोण ? त्याची हीच अपेक्षा होती. मात्र आज सगळीकडे त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसतात. हे दोघे ज्या प्रकारे काम करतात यांना आता पोटशुळ उठला आहे. जे काम अडीच महिन्यात केलं पुढील दोन वर्षात केलं तर आम्ही औषधाला देखील राहणार नाही, या हेतूने हे टीका चालू केल्याचा टोमणा नाव न घेता सुप्रिया सुळे व अजित पवार यांना श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला उद्धव ठाकरे यांना टोला
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घोषवाक्य होते की, गर्व से कहो हम हिंदू है. या वाक्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात काही कारभार झाला का ? जी आघाडी केली. त्या आघाडीमध्ये हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलायला घाबरायचो. हिंदूह्रदय सम्राट हे वंदनीय झाले अशा परिस्थितीत शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला. तो चुकीचा होता का? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
आणखी वाचा :