एक्स्प्लोर

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत

रावसाहेब दानवे यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हकलण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. शिवाय त्यांच्या नावाला पर्याय म्हणून अनेक नावं समोर येत आहेत.

अकोला: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पदावरुन दूर करण्याच्या हालचाली  सुरु झाल्या आहेत. त्यामुळे संभाव्य प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य नावांमध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. खासदार संजय धोत्रेंनी सलग तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय नोंदवला आहे. तीनही वेळा त्यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी केल्यास राज्याची धुरा मराठा, ओबीसी समाजातील नेतृत्वाकडे देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठा, ओबीसी नेतृत्वाची चाचपणी केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी खासदार संजय धोत्रे यांचे नाव चर्चेत आहे. धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपनं अकोल्यात विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी म्हणून खासदार संजय धोत्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांच्या संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अकोला जिल्ह्यात मोठी उत्सुकता दिसून येत आहे. कोण आहेत संजय धोत्रे?
  • भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार
  • सलग तीनवेळा लोकसभेवर निवडून
  • तीनही वेळा भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांचा पराभव
  • नितीन गडकरींचे विश्वासू म्हणून परिचीत
  • अमरावतीतून इंजिनिअरिंगची पदवी
  • 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीसापासून राजकारणात प्रवेश
  • 1999 मध्ये भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत विजय
  • 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय.
  • सूचना तंत्रज्ञ समितीचे सदस्य
  • 2009 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजय
  • 31 ऑगस्ट 2009 पासून ग्रामीण विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget