एक्स्प्लोर
खासदार दिलीप गांधींना टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ!
अहमदनगर मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. भाजप खासदार दिलीप गांधी यांनाच या गलथानपणाचा फटका बसला आहे.
अहमदनगर : अहमदनगर मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. भाजप खासदार दिलीप गांधी यांनाच या गलथानपणाचा फटका बसला आहे.
खासदारांच्या घरी पाणीच येत नसल्यानं त्यांना चक्क टॅकरनं पाणी विकत घ्यावं लागत आहे. अहमदनगरमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्यानं आपल्याला टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं दिलीप गांधी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपची पालिकेत सत्ता आहे.
टँकरसाठी पालिकेला लाखो रुपयांचा खर्च येत आहे. तरीही शहराची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
एकीकडे अधिकारी अनेक घोटाळ्यात अडकले आहेत. तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये स सुसुत्रता नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अहमदनगरच्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement