एक्स्प्लोर
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपच्या वाटेवर?

मुंबई : राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत ते लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑफरवर संभाजीराजेंनी तूर्तास वेट अँड वॉच हे धोरण स्वीकारलं आहे. भाजपकडून काय ऑफर येईल यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं आहे. दरम्यान नरेंद्र जाधव यांनी सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर भाजपनं संभाजीराजेंना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता संभाजी राजेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















