देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. Rangnath Pathare : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे; रंगनाथ पठारे यांचे आवाहन


Rangnath Pathare : मराठी भाषेला अभिजात दर्जा (Marathi Classical Language) लवकरात लवकर मिळावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी एकत्र येऊन ही मागणी पंतप्रधानांसमोर मांडली पाहिजे, असे मत मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे (Rangnath Pathare) यांनी  व्यक्त केली आहे. मराठी  भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.  महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असून मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र  यावे असे आवाहन पठारे यांनी केली आहे. वाचा सविस्तर 


2. Jammu Kashmir Attack : दहशतवाद्यांकडून पुन्हा सामान्य नागरिक लक्ष्य, अनंतनागमध्ये सर्कसमधील कर्मचाऱ्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू


Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये (Anantnag) दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी सोमवारी (29 मे) जंगलात मंडीजवळील अम्युझमेंट पार्कमधील सर्कसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. दीपू असं या नागरिकाचं नाव असून तो उधमपूरचा रहिवासी आहे. जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. वाचा सविस्तर 


3. Rajasthan Politics : अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समेट, खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर दोघांमधील वादावर पडदा


Rajasthan Politics : कर्नाटक विधानसभेचा रणसंग्राम जिंकल्यानंतर काँग्रेसचं संपूर्ण लक्ष आता राजस्थानकडे (Rajasthan) आहे. राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात सुरु असलेला वाद रोखण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राजस्थान काँग्रेस प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा, राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सोमवारी (29 मे) सुमारे चार तास बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेते बाहेर आले, मात्र फक्त केसी वेणुगोपाल यांनीच माध्यमांना संबोधित केलं. पत्रकारांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनाही प्रश्न विचारले, परंतु दोघांनीही कोणतंही भाष्य करण्यास टाळलं, त्यांनी केवळ स्मितहास्य करत प्रसारमाध्यमांचा निरोप घेतला. वाचा सविस्तर 


4. Wrestlers Protest: "आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन..."; व्हिडीओ जारी करत साक्षी मलिकचं आवाहन


Sakshi Malik On Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest) सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार साक्षी मलिकनं (Sakshi Malik) केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. पण 28 मे रोजी दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या झटापटीनंतर आंदोलन मोडून काढण्यात आलं. कुस्तीपटूंनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एफाआयआर दाखल करुन त्यांना सोडण्यात आलं. अशातच साक्षी मलिकनं सोमवारी (29 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे. साक्षी मलिक म्हणाली की, "आम्ही मागे हटलेलो नाही." वाचा सविस्तर 


5. India-UK Relation: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या मंत्र्यांना सल्ला; म्हणाले, 'लोकशाही स्वातंत्र्य...'


S Jaishankar Meets Tariq Ahmad: भारत (India) दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे परराष्ट्र राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद (Loard Tariq Ahmad) यांनी सोमवारी (29 मे) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांची भेट घेतली. 27 मे ते 31 मे दरम्यान लॉर्ड तारिक अहमद भारत दौऱ्यावर होते. यावेळी भारत आणि ब्रिटनमधील संबंध मजबूत करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. वाचा सविस्तर 


6. CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन


CSK Won Against GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं. जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. वाचा सविस्तर 


7. 30th May In History: संघटित कामगार चळवळीचे जनक ना.म. जोशी यांचे निधन, अभिनेते परेश रावल यांचा जन्म; आज इतिहासात...


30th May In History: प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक समजले जाणारे नारायण मल्हार जोशी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांचा आज जन्म दिवस आहे. गोवा राज्याला आजच्या दिवशी राज्याचा दर्जा देण्यात आला. जाणून घेऊयात, महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 


8. Horoscope Today 30th May 2023: कुणाच्या राशीत आर्थिक फायदा, तर कुणाच्या राशीत ताणतणाव; कसा असेल 12 राशींचा आजचा दिवस?


Horoscope Today, Daily Horoscope, Rashibhavishya 30 May 2023: राशीभविष्यानुसार, 30 मे 2023, मंगळवारचा दिवस महत्त्वाचा आहे. आज मेष राशीच्या लोकांना काशीही काळजी घ्यावी लागणार आहे. थोड्याशा चुकीमुळेही मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तसेच, वृषभ राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी मंगळवारचा दिवस कसा राहील? जाणून घ्या तुमच्या राशीनुसार आजचं राशीभविष्य... (Rashibhavishya in Marathi) वाचा सविस्तर