Sahitya Akademi President Madhav Kaushik : साहित्य क्षेत्रातील सगळ्यात प्रतिष्ठित संस्था मानली जाणारी साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदाची अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदाची निवडणूक आज सकाळी पार पडली आहे. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी माधव कौशिक (Madhav Kaushik) यांची निवड झाली आहे. 


साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी आज सकाळी निवडणूक झाली. यात माधव कौशिक यांचा विजय झाला आहे. मराठी साहित्यिक रंगनाथ पठारेहेदेखील (Rangnath Pathare) रिंगणामध्ये होते. आधीच्या मराठी उमेदवरांपेक्षा पठारे यांनी अधिक प्रचार केला होता. पण अखेरीस त्यांचा पराभव झाला आहे. कन्नड साहित्यिक डॉ. मल्लापुरम व्यंकटेश (Mallepuram Venkatesh) हेदेखील रिंगणामध्ये होते. 


साहित्य अकादमीला यंदाही मराठमोळा अध्यक्ष नाहीच


भारतीय भाषांचे संवर्धन करणाऱ्या साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली आहे. पण आतापर्यंत या अकादमीचा अध्यक्ष मराठी लेखक होऊ शकलेला नाही. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक झाली आहे. याआधी भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) आणि यावेळी रंगनाथ पठारे (Rangnath Pathare) हे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर यात माधव कौशिक यांनी बाजी मारली आहे. पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी कौशिक यांच्यासह प्रसिद्ध मराठी लेखक रंगनाथ पठारे आणि कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश यांच्यात लढत होती. साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीच्या 97 सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले.


साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्याबद्दल जाणून घ्या (Who Is Madhav Kaushik)


माधव कौशिक यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1954 रोजी हरियाणातील भिवानी शहरात झाला. हिंदी कविता, कथा, बालसाहित्य, गझल या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे. 'सारे सपने बागी है', 'ऐनो के शहर में', 'किरण की सुभा', 'सपने खुली निगाहों के', 'हाथ सलामत रहने दो', 'आसमान सपनों का' आणि 'सदी का सन्नाटा' या त्यांच्या काही गाजलेल्या गझल आहेत. 


साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते?


देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. 1963 मध्ये त्यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर 1994 साली त्यांच्या निधनानंतर डॉ. एस. राधाकृष्णन यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर 1968 मध्ये डॉ. झाकीर हुसेन यांची साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.



 संबंधित बातम्या


Marathi: अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष आहेत? त्याने काय फायदा होतो? आतापर्यंत कोणत्या भाषांना हा दर्जा मिळालाय? जाणून घ्या सर्वकाही