देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. (वाचा सविस्तर)
मुख्यमंत्री असावा तर असा... बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांसाठीचे 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' मागे घेण्याचे सिद्धरमय्यांचे आदेश
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरमय्या अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरमय्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. . त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये त्यांनी बंगळुरू पोलिसांना मुख्यमंत्र्यांसाठीचा 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' मागे घेण्यास सांगितलं. (वाचा सविस्तर)
हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार म्हणतात...
कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण 'हिजाब वाद' हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या मतदारसंघातून हिजाब वादाला सुरुवात झालेली, त्या भागातून निवडून आलेल्या कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी काँग्रेस हिजाबवरील बंदी हटवेल, असे वक्तव्य केले आहे. (वाचा सविस्तर)
जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन
काश्मीरमध्ये आजपासून तीन दिवसीय जी-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चीन, तुर्की आणि सौदी अरब हे बैठकीत सहभागी होणार नाहीत. बैठकीत 25 देश सहभागी होतील अशी माहिती आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे. (वाचा सविस्तर)
"मी नार्को टेस्टसाठी तयार, पण कुस्तीपटूंचीही..."; बृजभूषण यांनी घातली मोठी अट
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, पण विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही टेस्ट व्हायला हवी, अशी अटही त्यांनी घातली आहे. (वाचा सविस्तर)
बंगळुरूमध्ये वळीव पावसाचा धुमाकूळ; झाडे उन्मळून पडली, बहुमजली इमारत कोसळली
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये वळीव पावसाने अक्षरश: कहर केला. या पावसाने धावणारे शहर पूर्णत: ठप्प झाले. दोन तास पावसाने घातलेल्या धुमशानात भुयारी मार्गात पाणी साचून कार बुडाल्याने इन्फोसिसमधील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. भानू रेखा असे त्या महिलेचे नाव आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 23 वर्षीय महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. (वाचा सविस्तर)
आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य
आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. तर, काही राशींनी काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
राजा राममोहन रॉय यांचा जन्म, कॉम्रेड डांगे यांचे निधन; आज इतिहासात...
प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. प्रत्येक दिवशी इतिहासात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भारतात नवविचाराचे जनक समजले जाणारे राजा राममोहन रॉय यांचा आज जन्मदिवस आहे. तर, भारतीय स्वातंत्र्यलढा, कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते असलेले कॉम्रेड डांगे यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते. जाणून घेऊयात आजच्या दिवसातील घडामोडी..(वाचा सविस्तर)