देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Mararashtra NCP Crisis: 2024 मध्ये भाजपला का हवीये अजित पवारांची साथ? काय आहे निवडणुकीपूर्वीचा गेम प्लान?


Mararashtra NCP Crisis: 2024 ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपनं कंबर कसली असून अनेक राज्यांत विरोधकांना थोपवण्यासाठी आतापासूनच डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या एका गटानं मोदींना रोखण्यासाठी एकजुट केली आहे. 2024 च्या दृष्टीनं सर्वात मोठा डाव भाजपनं महाराष्ट्रात टाकल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेलं बंड हेदेखील भाजपचाच (BJP) एक कट असल्याचं बोललं जात आहे. अशातच अजित पवारांना सोबत घेणं हे 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरेल? हे जाणून घेऊयात...  वाचा सविस्तर


Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष


Maharashtra Election News: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra NCP Political Crisis) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) भूकंपानंतर आता जवळपास सर्वच समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabah Election 2024) झाली तर निकाल काय लागतील आणि जनतेचा कौल कोणाला मिळेल? हे प्रश्न आतापासूनच सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहेत. वाचा सविस्तर 


Manipur Violence : मणिपूरमध्ये इंटरनेट बंदी पुन्हा वाढवली! हिंसाचारात आतापर्यंत 120 ठार, तर 3 हजारहून अधिक जखमी


Manipur Violence Latest News : भारताच्या ईशान्येकडील मणिपूर (Manipur) राज्यात जातीय हिंसाचार (Violence) सुरुच आहे. या पार्श्नभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेटवरील बंदी पुन्हा एकदा वाढवली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी आता 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मणिपूर सरकारने बुधवारी यासंदर्भात माहिती देत सांगितलं की, शांतता आणि सुव्यवस्थेला राखण्यासाठी राज्यातील इंटरनेट सेवा बंदी पाच दिवसांनी वाढवण्यात आली ​​आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी वेळोवेळी वाढवण्यात येत आहे. वाचा सविस्तर 


Kedarnath Dham : केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये


Chardham Yatra 2023 : पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेलं केदारनाथ (Kedarnath) हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी (Ban) घातली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे केदारनाथ लोकांच्या मनांत भिनलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच असते. उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंसाठी आस्थेचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने नवा आदेश जारी केला आहे. वाचा सविस्तर 


Weather updates : उत्तर भारतासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; वाचा हवामान विभागाचा अंदाज 


Weather updates : देशातील विविध राज्यात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ या राज्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


PM Modi : पंतप्रधान मोदी उद्यापासून चार राज्यांचा दौरा करणार, 50000 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 आणि 8 जुलै रोजी चार राज्यांना भेट देणार आहेत. यावेळी ते सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश राज्याला भेट देणार आहेत. तर  8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगणा आणि राजस्थानला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. वाचा सविस्तर 


RBI News: आता डेबिट-क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकच कार्ड नेटवर्क निवडू शकणार; RBI कडून परिपत्रक जारी


RBI Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड (Debit / Credit / Prepaid Cards) जारी करण्याच्या नियमांबाबत एक ड्राफ्ट सर्क्युलर (Draft Circular)  जारी केलं आहे. या सर्क्युलरमध्ये आरबीआयनं अधोरेखित केलं आहे की, डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड जारी करण्यासाठी, कार्ड नेटवर्कचं (Card Networks) कार्ड जारी करणाऱ्या बँका किंवा बिगर बँकिंग संस्थांशी करार आहे, जो ग्राहकांच्या हिताचा नाही. RBI नं या ड्राफ्ट सर्कुलरवर 4 ऑगस्ट 2023 पर्यंत स्टेकहोल्डर्सकडून सूचना मागवल्या आहेत. वाचा सविस्तर 


Khalistan Protest : कॅनडानंतर लंडनमध्येही खलिस्तान समर्थकांची हल्ल्याची तयारी, रॅलीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर; भारतीय राजदूतांना लक्ष्य


Khalistani Protest : विदेशातील भारतीय दूतावासावरील (Indian Embassy) खलिस्तानी (Khalistan) हल्ले सुरुच आहे. अमेरिका (America) आणि कॅनडानंतर (Canada) आता लंडन (London) मध्येही खलिस्तानी समर्थक आक्रमक होताना दिसत आहे. लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून रॅली काढण्यात येणार आहे. लंडनमध्ये खलिस्तानी समर्थक काही पोस्टर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर 


6th July In History: लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म; उद्योजक धीरूभाई अंबानी यांचे निधन; आज इतिहासात


6th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. या दिवसातील घडामोडी महत्त्वाच्या असतात. आजच्या दिवशी भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन झाले. त्यांनी विजेशी संबंधित नवीन शोध लावले. त्यांचा ओहमचा नियम प्रसिद्ध आहे. तर, हिंदू महासभेचे नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. मराठी साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांचीही आज जयंती आहे. तर, भारतातील यशस्वी उद्योजक धीरुभाई अंबानी यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 06 July 2023 : मेष, वृषभ, मकर राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 06 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांची कामगिरी चांगली आणि आनंददायी असेल. कन्या राशीला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर