RBI Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड (Debit / Credit / Prepaid Cards) जारी करण्याच्या नियमांबाबत एक ड्राफ्ट सर्क्युलर (Draft Circular)  जारी केलं आहे. या सर्क्युलरमध्ये आरबीआयनं अधोरेखित केलं आहे की, डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड जारी करण्यासाठी, कार्ड नेटवर्कचं (Card Networks) कार्ड जारी करणाऱ्या बँका किंवा बिगर बँकिंग संस्थांशी करार आहे, जो ग्राहकांच्या हिताचा नाही. RBI नं या ड्राफ्ट सर्कुलरवर 4 ऑगस्ट 2023 पर्यंत स्टेकहोल्डर्सकडून सूचना मागवल्या आहेत. 


आरबीआयचं  (RBI) हे ड्राफ्ट सर्क्युलर, कार्ड जारी (Card Issuers) करणार्‍या बँकांना किंवा बिगर बँकिंग संस्थांना आदेश देतं की, ते एकापेक्षा जास्त नेटवर्कवाले कार्ड्स जारी करू शकतात. यासह, या ड्राफ्ट सर्क्युलरमधून ग्राहकांना एक पर्यायही देण्यात आला आहे की, मल्टीपल कार्ड नेटवर्क्स (Multiple Card Networks) मधून त्यांना हवा तो पर्याय निवडू शकतात. म्हणजेच, ग्राहकांना Visa, Mastercard, American Express, Diners Club International किंवा RuPay मधून निवडण्याचा पर्याय असेल. 


आरबीआयनं म्हटलं आहे की, कार्ड जारी करणाऱ्या बँका किंवा बिगर बँकिंग संस्थां कार्ड नेटवर्कशी कोणताही करार करू नये, ज्या करारामुळे त्यांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवा वापरण्यापासून रोखलं जाईल. 


RBI ने ड्राफ्ट सर्क्युलरमध्ये असंही म्हटलं आहे की, कार्ड जारी करणार्‍या बँका किंवा बिगर बँकिंग संस्था आणि कार्ड नेटवर्कनं या सर्क्युलरच्या तारखेपासून नवीन करार अंमलात आणताना, विद्यमान करारांमध्ये सुधारणा किंवा नूतनीकरण करताना या नियमांचं पालन केलं पाहिजे. 


कार्ड जारी करणाऱ्या बँक किंवा नॉन-बँकिंग संस्थांसाठी एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्कचे कार्ड जारी करण्याचा नियम आणि ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कपैकी एक निवडण्याचा आदेश 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India Crude Oil: रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी, इंधन कंपन्यांना 'इतका' फायदा; ग्राहकांचे काय?