देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, जयंत पाटलांचा दावा कितीपत खरा? अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी 'गूड न्यूज'


Maharashtra Politics Crisis: राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे रविवारी (2 जुलै) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद कमी होईल. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, अजित पवारांच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच, भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याच्या अजि पवारांचा दावा खोटा असून त्यांना पक्षाचा कोणताही पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. वाचा सविस्तर 


2. Sharad Pawar Satara Visit : शरद पवार पुन्हा रान उठवणार, आज कराडचा दौरा, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेणार


Sharad Pawar Satara Visit : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा रान उठवणार आहे. शरद पवार आज साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यावर जाणार आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. वाचा सविस्तर 


3. Maharashtra Politics Ajit Pawar: कोश्यारीनंतर बैस यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात? राष्ट्रवादीच्या गटनेत्याच्या पत्राशिवाय शपथविधी?


Maharashtra Politics Ajit Pawar:  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायलयाने ताशेरे ओढले होते. आज, अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील राष्ट्र्वादी काँग्रेस (Nationalist Congress Party) महायुतीत सहभागी होत असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधीवर प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्याच्या पत्राशिवाय शपथ दिली का, याची चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. तर, आधीचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. वाचा सविस्तर 


4. Monsoon Update : गूड न्यूज! संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट


India Weather Update : हवामान विभागाने 'गूड न्यूज' दिली आहे. संपूर्ण देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने माहिती दिली आहे की, साधारणपणे संपूर्ण भारतात 8 जुलैपर्यंत मान्सून दाखल होतो. पण, यंदा 8 जुलै आधीच  संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. आता संपूर्ण देशात मान्सून पसरला आहे. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशात मान्सून पसरल्याच रविवारी जाहीर केलं आहे. जुन महिन्यामध्ये 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. वाचा सविस्तर 


5. मुसळधार पावसाचा खिशावरही परिणाम! भाज्यांचे भाव गगनाला भिडले, आलं आणि टोमॅटो विक्रमी किमतीला


Rain Effect on Vegetables : राज्यासह देशात मान्सून (Monsoon) चांगलाच सक्रिय झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम होताना दिसत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. आधी उन्हामुळे शेतकऱ्यांची पिकं करपली होती, त्यानंतर अवकाळीनं गोंधळ घातला. आता तर, पावसामुळे पिकांची नासाडी होताना दिसत आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे 50 रुपये किलोच्या पुढे आहेत. आलं आणि टोमॅटो विक्रमी किमतीला विकलं जात आहे. महाराष्ट्रातील भंडाऱ्यात टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महाग आहे. आल्याच्या किमतीनंही रडकुंडीला आणलं आहे. वाचा सविस्तर 


6. Elon Musk यांचा ट्विटरवर नवा विक्रम, 38 शब्दांच्या 'या' ट्वीटला मिळाले तब्बल 528 मिलियनहून अधिक व्ह्यूज; तुम्ही पाहिलंत का?


Twitter : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून कायम चर्चेत राहिलं आहे. नुकतीच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घातल्या असल्याची मोठी घोषणा केली. मस्क यांनी एक ट्वीट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, सशुल्क यूजर्स म्हणजेच ब्लू टिक असलेले लोक एका दिवसात 10,000 पोस्ट वाचू शकतील. त्याचप्रमाणे, अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला 1,000 पोस्ट पाहू शकतात तसेच, ज्या लोकांनी नुकतंच ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे असे यूजर्स दिवसाला 500 पोस्ट वाचू शकतील. मस्क यांनी सुरुवातीला ट्वीट वाचण्याच्या मर्यादेसंदर्भात 38 शब्दांचे ट्विट केले. त्यानंतर त्यात काही अपडेट केले. वाचा सविस्तर 


7. Russia-Ukraine War : अखेर रशिया-युक्रेन युद्ध संपणार? झेलेन्स्कींनी ठेवली 'ही' अट, पुतिन काय भूमिका घेणार?


Ukraine-Russia : युक्रेन  (Ukraine) आणि रशियातील (Russia) युद्ध अद्यापही सुरुच असून याला आता 16 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. दोन्ही देशांकडून एकमेंकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरुच आहे. या युद्धामध्ये युक्रेन आणि रशियामधील हजारो नागरिक आणि सैनिकांनी आपली जीव गमवावा लागल आहे. मात्र, युद्ध शमण्याचं नाव घेत नाही आहे. या युद्धाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Vladimir Zelensky) यांनी आता युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. पण, त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. वाचा सविस्तर 


8. 3rd July In History: महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली; आज इतिहासात...


3rd July In History: आजच्या दिवशी महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्याशिवाय, आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि त्याचे नैसर्गिक पर्यावरणावर होणारे घातक परिणाम याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. वाचा सविस्तर 


9. Horoscope Today 03 July 2023 : मिथुन, कन्या, मकरसह 'या' राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस कसा असणार? जाणून घ्या आजचं राशीभविष्य


Horoscope Today 03 July 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबाची उणीव भासेल. कन्या राशीच्या लोकांना मित्रांचं सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर