Horoscope Today 03 July 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबाची उणीव भासेल. कन्या राशीच्या लोकांना मित्रांचं सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 


मेष


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. जे घरापासून दूर नोकरी करत आहेत, त्यांना वडिलांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे काम करावे लागेल, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. जुन्या मित्रांबरोबरही आजचा वेळ चांगला जाईल. जे तरूण नोकरीच्या शोधात फिरतायत त्यांना काही काळ चांगल्या संधीची वाट पाहावी लागेल. आज आईबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज व्यवसायात विशेष कामात यश मिळेल. आज तुमचे आरोग्य चांगले असेल त्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी असाल. तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या जीवनात तुमची प्रगती झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. 


वृषभ


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. कुटुंबाच्या उन्नतीसाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर काम कराल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुमचे मित्रही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करतील. आज तब्येतीची चिंता राहील. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. 


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुमच्यात आत्मविश्वास भरपूर असल्यामुळे तुम्ही सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण कराल. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचेही सहकार्य मिळेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तुम्हाला एक सरप्राईज पार्टी देतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही पूजा आणि पठणही करा. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. नोकरीत जास्त मेहनत करावी लागू शकते. 


कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असेल, परंतु वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हा तणाव लवकरच संपुष्टात येईल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधीही मिळेल. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. कामाच्या ठिकाणी कोणाच्याही सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत बढतीसाठी काळ अनुकूल आहे.  घरात शांतता नांदावी यासाठी पूजा, पाठ आयोजित केले जातील.


सिंह


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन वाहन खरेदीचा आनंदही मिळेल. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर ती उद्या चांगल्या किमतीत विकली जाऊ शकते. नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या इतर संधी मिळतील. सासरच्या मंडळींकडून काही शुभ वार्ता ऐकायला मिळतील.जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरीत यश मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. 


कन्या


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील प्रत्येकजण तुम्ही केलेल्या कामामुळे खूप खूश असेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यास आर्थिक लाभ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. राजकारणात यश मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले आहे.


तूळ


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांमार्फत उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. आज तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत कराल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे गुंतवाल. आज सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील आणि उच्च अधिकार्‍यांकडून लाभ होईल. व्यवसायातही प्रगती होईल. आज तुम्हाला दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.


वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आज तुम्ही खूप उत्साही वाटाल, त्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही पैसे कसे वाचवायचे ते शिकाल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. भावाच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी मित्राच्या मदतीने दूर होतील. घरोघरी शुभ कार्यक्रमही आयोजित होतील, सर्व लोकांची ये-जा सुरू राहील. आज कोणाच्या सल्ल्याने गुंतवणूक केली नाही तर नुकसान होऊ शकते. व्यवसायात यश मिळेल. 


धनु


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरीत प्रगती झाल्यानंतर नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. घरात पूजा, पाठही आयोजित केले जातील. या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा सुरु राहील. आज तुमचा जुना मित्र तुम्हाला भेटेल त्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आज तुम्हाला वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी वेळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. राजकारण्यांसाठी आजचा काळ अतिशय अनुकूल आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. शिक्षणात नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात यश मिळेल.


मकर


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांमार्फत उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची सर्व कामे पूर्ण कराल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. तुम्ही तुमच्या घरात काही नवीन वस्तू देखील खरेदी करू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. दूरच्या नातेवाईकाकडून मिळालेल्या आनंदाच्या बातमीने तुम्ही खूप आनंदी दिसाल. मित्रपरिवारातील सर्व लोक एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देतील. शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला नाही. राजकारणात प्रगती होईल. बँकिंग नोकरीत बढतीचा मार्ग खुला होईल. व्यवसाय आणि नोकरीसाठी आजचा काळ अनुकूल आहे. नोकरीत जबाबदारीबाबत संभ्रम राहील. बँकिंग आणि आयटी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना पदोन्नती शक्य आहे. 


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. आज तुमचे जास्त पैसे खर्च होतील, त्यामुळे जपून पैसे वापरा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. लहान भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदाचे काही क्षण घालवा. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. बँकिंग नोकरीत बढतीचा मार्ग खुला होईल. शिक्षणाशी संबंधित लोकांना यश मिळेल. व्यवसाय आणि नोकरीसाठी आजचा काळ अनुकूल आहे.


मीन
 
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर आईला खूप आनंद होईल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते आज परत मिळतील. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही आवडत्या गोष्टी करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आज पोटाच्या विकारामुळे त्रास होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या तरुणांना भरपूर फायदा होणार आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 02 July 2023 : मेष, कर्क, धनु, मीन राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य