Sharad Pawar Satara Visit : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा रान उठवणार आहे. शरद पवार आज साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यावर जाणार आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

शरद पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात घडलेल्या या राजकीय घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, तेवढं करेन, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हेच धोरण आहे."

गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची मला चिंता

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, "एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भमिका मांडली. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी चार ते पाच जणच निवडून आले, बाकी सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची मला चिंता नाही. जे सोडून गेलेत त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे."

शरद पवार यांचा सातारा दौरा

सकाळी 8 वाजता : पुण्याहून निघणारसकाळी 11 वाजता : साताऱ्यातील कराडमध्ये आगमनसकाळी 11 ते 11.30 वाजता : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचं दर्शन

सकाळी 11.15 वाजता : कराडहून निघणारदुपारी 12 वाजता : साताऱ्याला पोहोचणार

दुपारी 12 ते 1 वाजता: रयत शिक्षण संस्थेची बैठकदुपारी 1 ते 1.45 वाजता: विश्रामदुपारी 2 वाजता : पश्चिम महाराष्ट्र मातंग परिषदेला उपस्थिती

दुपारी 3.30 वाजता: साताऱ्याहून निघणाररात्री 8.30 वाजता: मुंबईत आगमन

हेही वाचा