देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दीड लाखांहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार
Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
PM Narendra Modi : 2014 ला 'चाय पे चर्चा', 2019 ला महिला मेळावा; पंतप्रधान मोदींसाठी यवतमाळ 'लक्की'
PM Narendra Modi Visit Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तब्बल 45 एकरवर उभारण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. मात्र, त्यांच्या याच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्याची एक आणखी चर्चा असून, मोदींसाठी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा 'लक्की' असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण म्हणजे 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मोदींनी याच यवतमाळ जिल्ह्यातून फुंकले होते आणि त्यानंतर दोनही वेळ ते पंतप्रधान झाले. वाचा सविस्तर...
दिलासादायक! PM किसानचा 16 हप्ता आज जमा होणार, राज्यातील शेतकऱ्यांनी मिळणार 6000 रुपये
PM Kisan Samman Nidhi : आज देशातील शेतकऱ्यंना (Farmers) एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत. कारण, पंतप्रधान किसान सन्मान निधीसह राज्या सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. वाचा सविस्तर...
BMC : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली होणार, बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
BMC Commissioner Transfer : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली होणार आहे. बदली रोखण्यासाठी राज्य सरकारनं (Maharashtra Government) केलेली मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने (Election Commission) फेटाळली आहे. त्यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कराव्याच लागणार आहेत. वाचा सविस्तर...