एक्स्प्लोर

Morning Headlines 13th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज

India Alliance Coordination Committee Meeting: 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) च्या कोआर्डिनेशन कमेटीची (समन्वय समिती) पहिली बैठक बुधवारी (13 सप्टेंबर) होणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या प्रचारासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि रणनीती यावर व्यापक चर्चा होणार असल्याचं मानलं जात आहे. वाचा सविस्तर 

Chandrababu Naidu Case: नजरकैदेची याचिका फेटाळल्यानंतर, जामीनासाठी चंद्राबाबूंची हायकोर्टात धाव, 'या' मागण्यांसह याचिका दाखल

Chandrababu Naidu Arrest: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयानं तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांची नजरकैदेची याचिका फेटाळल्यानंतर, टीडीपी नेत्याच्या कायदेशीर पथकानं आता जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court Of Andhra Pradesh) दोन याचिका दाखल केल्या आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी या याचिकांमार्फत त्यांच्यावरील खटला रद्द करण्याची विनंती केली आहे. चंद्राबाबूंच्या या याचिकांवर बुधवारी (13 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. यापूर्वी, विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयानं चंद्राबाबू नायडू तुरुंगात अधिक सुरक्षित राहतील, कारण त्यांना नजरकैदेत असताना 'झेड-प्लस' सुरक्षा प्रदान केली जाऊ शकत नाही, असं म्हणत त्यांची याचिका फेटाळली होती. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या कथित कौशल विकास महामंडळ घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

Kerala High Court : एकांतात अश्लील व्हिडीओ पाहणे ही वैयक्तिक आवडीची बाब : केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

Kerala High Court : "अश्लील फोटो किंवा व्हिडीओ इतरांना न दाखवता एकट्याने पाहणे कायद्यानुसार गुन्हा नाही." असं केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कारण ही प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीची बाब आहे. हा गुन्हा ठरवणे हा एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेत घुसखोरी आणि त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीत हस्तक्षेप ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने 33 वर्षीय तरुणावरील खटलाही रद्द केला आहे. वाचा सविस्तर 

Droupadi Murmu : शेतकरी हेच मोठे संवर्धक, त्यांचं अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण : राष्ट्रपती

Droupadi Murmu : सर्व शेतकरी (Farmers) बांधव हेच मोठे संवर्धक असून, तेच पीक विविधतेचे खरे संरक्षक असल्याचे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान असून त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांचे अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर 

Agriculture News : रब्बी हंगामात रासायनिक खतांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करा, मंत्री मनसुख मांडवीया यांचं शेतकऱ्यांना आवाहन

Agriculture News : आगामी रब्बी हंगामात (rabi season) रासायनिक खते (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडवीया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केलं. जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मांडवीया म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नाला चालना देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत हाती घेतलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी 'किसान समृद्धी महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सरकारची योजना असल्याचे मांडवीया म्हणाले. वाचा सविस्तर 

iPhone 15 साठी  प्री-ऑर्डर कधीपासून? भारतात कधी उपलब्ध होणार? कसं बुक कराल? जाणून घ्या

iPhone 15 : Apple ने कॅलिफोर्नियातील Apple मुख्यालयाच्या 'स्टीव्ह जॉब्स थिएटर' येथे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max फोन लॉंच केले आहेत. आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स फोनमध्ये काय खास आहे? तसेच या फोनच्या प्री-ऑर्डर बुकिंगबाबत जाणून घ्या... वाचा सविस्तर 

13th September In History : क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचे तुरुंगात निधन, हैदराबाद संस्थानाकडून भारतीय लष्कराने तुळजापूर ताब्यात घेतले; आज इतिहासात

13th September In History : आज इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचे तुरुंगातील उपोषणात 63 व्या दिवशी निधन झाले. तर, भारत सरकारने  हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई सुरू केली. भारतीय लष्कराने पहिल्या तासातच तुळजापूर सर केले. भारतीय कवी आणि विचारवंत सज्जाद झहीर यांचा स्मृतीदिनही आज आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 13 September 2023 : मिथुन, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 13 September 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी सावधानतेचा असेल, तर वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget