एक्स्प्लोर

राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त

मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. त्याहीआधी भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे चित्र बाहेर आलो आहे.

मुंबई : महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रिक्त पद ही एक मोठी समस्या आहे अशी कर्मचारी संघटनांची नेहमी तक्रार असते. त्या तक्रारीला पूरक अशी माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना काल ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये 31 डिसेंबर 2019 अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. सरळसेवा, पदोन्नती मिळून वेगवेगळ्या विभागासाठी 10 लाख 91 हजार 104 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरली गेली आहेत. उर्वरीत मंजुर पदाची भरती न झाल्यामुळे 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये विविध महामंडळं जसं की खादी ग्राम उद्योग एसटी महामंडळ याचा समावेश नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. त्याहीआधी भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे चित्र बाहेर आलो आहे. माहिती अधिकारात सर्वच विभागांमध्ये या रिक्त पदांची माहिती आहे. परंतु सर्वाधिक रिक्त पदे कोण कोणत्या विभागात आहेत याची आकडेवारी ग्रह विभागांमध्ये सर्वात जास्त सुमारे 28 हजार पदे रिक्त आहेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये 20,509 पदं रिक्त आहेत जलसंपदा विभागामध्ये 20873 कृषी विभागांमध्ये सुमारे 14 हजार महसूल आणि वन विभागामध्ये सुमारे 12 हजार शालेय क्रीडा विभागामध्ये सुमारे 5 हजार आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 8 हजार 628 पदे रिक्त आहेत. विभागानुसार रिक्त पदं आणि भरण्यात आलेली पदं
  • गृह विभागात एकूण 1,46,507 रिक्त मंजूर पदे होती त्यातील 1,31,473 पदे भरण्यात आली. हे प्रमाण 89.73% एवढे असून 15,034 जागा अजूनही रिक्त आहेत
  • सार्वजनिक आरोग्य विभागात 50138 पदे मंजूर होती त्यातील 35,998 पदे भरण्यात आली. हे प्रमाण 71.79% एवढे असून 14,140 जागा रिक्त आहेत
  • जलसंपदा विभागात 33,126 पदे मंजूर होती त्यातील 18391 पदे भरण्यात आली. हे प्रमाण 55.51% एवढे असून अजून 14,735 जागा रिक्त आहेत
  • कृषी विभागात 9112 पदे मंजूर होती त्यातील 5071 पदे भरण्यात आली असून हे प्रमाण 55.65% एवढे आहे अजूनही 4041 जागा रिक्त आहेत
  • उच्च व तंत्रशिक्षण विभागात 10668 पदे मंजूर असून यातील 7425 पदे भरली आहेत हे प्रमाण 69.60% एवढे आहे अजूनही 3243 पदे रिक्त आहेत
  • महसूल व वने विभागात 56251 पदे मंजूर असून यातील 49142 पदे भरली आहेत हे प्रमाण 87.36% एवढे आहे अजूनही 7109 जागा रिक्त आहेत
  • वित्त विभागात 11239 पदे मंजूर असून यातील 8413 पदे भरण्यात आली आहेत हे प्रमाण 74.85% एवढे असून अजूनही 2826 जागा रिक्त आहेत
  • आदिवासी विभागात 17709 पदे मंजूर असून यातील 11329 पदे भरली असून हे प्रमाण 63.97% आहे अजूनही 6380 पदे रिक्त आहेत
  • शालेय शिक्षण व क्रीडा विभागात 4946 पदे मंजुर असून त्यातील 2342 पदे भरण्यात आली आहेत हे प्रमाण 47.35% एवढे आहे अजूनही 2604 पदे रिक्त आहेत
  • सार्वजनिक बांधकाम विभागात 17145 पदे मंजूर असून यातील 10206 पदे भरली आहेत हे प्रमाण 59.52 एवढे आहे अजूनही 6939 जागा रिक्त आहेत
  • सहकार व पणन विभागात 4016 पदे मंजूर असून यातील 2103 पदे भरली आहेत हे प्रमाण 52.36% एवढे आहे अजूनही 1913 पदे रिक्त आहेत
  • वस्त्रोद्योग विभागात 305 मंजूर पदांपैकी 177 पदे भरली असून हे प्रमाण 58.03 आहे अजूनही 128 पदे रिक्त आहेत
  • सामाजिक न्याय विभागातील 4754 मंजूर पदांपैकी 2618 पदे भरण्यात आली असून हे प्रमाण 55.06 आहे अजूनही 2136 पदे रिक्त आहेत
  • उद्योग विभागातील 2510 मंजूर पदांपैकी 2618 म्हणजेच 56.65% पदे भरली आहेत तर अजून 1088 पदे रिक्त आहेत
  • कामगार विभागातील 1728 मंजूर पदांपैकी 907 म्हणजेच 52.48% पदे भरली आहेत अजून 821 पदे रिक्त आहेत
  • अन्न व नागरी पुरवठा विभागातील 4620 मंजूर पदांपैकी 3026 पदे म्हणजेच 65.49 % पदे भरली आहेत अजून 1594 पदे रिक्त आहेत
  • पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील 2820 मंजूर पदांपैकी 1901 म्हणजेच 67.41% पदे भरली असून अजूनही 919 पदे रिक्त आहेत
  • विधी व न्याय विभागातील 15055 मंजूर पदांपैकी 14397 पदे म्हणजेच 95.62% पदे भरली आहेत तर अजून 658 जागा रिक्त आहेत
  • नगरविकास विभागात मंजूर 2284 पदांपैकी 1323 पदे म्हणजेच 57.92% पदे भरली आहेत अजूनही 961 पदे रिक्त आहेत
  • नियोजन विभागातील मंजूर 1015 पदांपैकी 678 पदे म्हणजेच 66.79 % पदे भरली असून अजूनही 337 पदे रिक्त आहेत
  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील 11555 मंजूर पदांपैकी 8336 पदे म्हणजेच 72.14% पदे भरली आहेत अजूनही 3219 पदे रिक्त आहेत
  • ग्रामविकास विभागातील 468 मंजूर पदांपैकी 399 पदे म्हणजेच 85.25% पदे भरण्यात आली असून अजूनही 69 पदे रिक्त आहेत
  • पर्यटन विभागातील 493 मंजूर पदांपैकी 285 पदे म्हणजेच 57.80% पदे भरण्यात आली असून अजूनही 208 पदे रिक्त आहेत
  • सामान्य प्रशासन विभागातील मंजूर 4627 पदांपैकी 3552 पदे म्हणजेच 76.76% पदे भरली असून अजूनही 1075 पदे रिक्त आहेत
  • गृहनिर्माण विभागातील 635 मंजूर पदांपैकी 356 पदे म्हणजेच 56.06% पदे भरली आहेत अजूनही 279 पदे रिक्त आहेत
  • अल्प संख्याक विभागातील 47 मंजूर पदांपैकी 31 पदे म्हणजेच 65.95% पदे भरली आहेत अजूनही 16 पदे रिक्त आहेत
  • पर्यावरण विभागातील मंजूर 9 पदांपैकी 7 पदे म्हणजेच 77.77% पदे भरली आहेत अजून 2 पदे रिक्त आहेत
  • मराठी भाषा विभागातील 140 मंजूर पदांपैकी 96 पदे म्हणजेच 68.57% पदे भरली आहेत तर 44 पदे अजून रिक्त आहेत माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ज्या विभागांनी माहिती दिली अश्या विभागाकडे शासनाने मंजूर केलेली पदे 4,63,985 एवढी असून यातील 3,58,009 पदे म्हणजेच 77.15% पदे भरली आहेत तर अजून 1,05,976 पदे रिक्त आहेत
अशी आहेत विभागनिहाय रिक्त पदं राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Fake Voters Nagarparishad Election: मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
Dhananjay Munde & Ratnakar Gutte: धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
Nagarparishad Election Result: मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग
Nilesh Rane : भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणेंचा आरोप, राणेंची पोलीस ठाण्यात धडक
Maharashtra Local Body Election Voting : मुंबई वगळता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आज मतदान, एक कोटी मतदार निवडणार 6304 प्रतिनिधी!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Fake Voters Nagarparishad Election: मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
Dhananjay Munde & Ratnakar Gutte: धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
Nagarparishad Election Result: मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
Maharashtra Election: मोठी बातमी: राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Mumbai Police News : मुंबईत फूटपाथवर चालताना गर्भवतीला वेदना; चालताही येईना.., पोलिसांची घटनास्थळी धाव, वस्त्रांचा केला आडोसा अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलमुळे सुखरुप प्रसुती
मुंबईत फूटपाथवर चालताना गर्भवतीला वेदना; चालताही येईना.., पोलिसांची घटनास्थळी धाव, वस्त्रांचा केला आडोसा अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलमुळे सुखरुप प्रसुती
Solapur Election 2025 : सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Nagarparishad LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Maharashtra Election LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Embed widget