एक्स्प्लोर
मराठा आंदोलन : वाळूज एमआयडीसीतील सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड
मराठा मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीसह तब्बल एकाच ओळीत उभ्या असलेल्या 20 गाड्या फोडल्याचाही दावा करण्यात येत आहे.
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन मोर्चाकडून करण्यात आले होते, मात्र तरीही अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबादेत तर जवळपास 60 कंपन्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.
औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात हिंसक वळण लागलं. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय, तर आणखी 10 ते 12 कंपन्यांचंही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.
उद्योगांना संरक्षण देण्याची गरज आहे. कंपन्या फोडल्याने मोठं नुकसान झालंय. आमच्या उद्योगांना संरक्षण मिळेल का, नसेल मिळणार तर आम्हालाही गुंतवणूक करण्यावर विचार करावा लागेल, असे उद्योजक संघटनेचे म्हणणे आहे.
मराठा मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीसह तब्बल एकाच ओळीत उभ्या असलेल्या 20 गाड्या फोडल्याचाही दावा करण्यात येत आहे. तसेच दोन खासगी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात तीन पोलिसांसह दोन स्थानिक पत्रकार जखमी झालेत.
संबंधित बातम्या :
शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं!
मराठा आंदोलनामुळे 25 दिवसात एसटीचं 50 कोटींचं नुकसान
महाराष्ट्र बंद : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सहा तासांनी सुरु
जालन्यात 3 महिन्यांचा चिमुकला ठिय्या आंदोलनात
मराठा मोर्चांविरोधात याचिका, आंदोलकांवर दंडात्मक कारवाईची मागणी
चांदणी चौकात राडा, आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार
मराठा आंदोलनादरम्यान संयम आणि शांतता बाळगा : नांगरे-पाटील
महाराष्ट्र बंद : लातूरात आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की
मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!
मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement