Monsoon Update: आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळीचा इशारा
Monsoon Update: मॉन्सून अंदमान बेटांपर्यंत दाखल झाला असून त्याची आगोकूच सुरू आहे. तसेच, पुढच्या आठवड्याभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
Maharashtra Monsoon Update: पुढच्या आठवडाभरात मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 2 दिवसांत राज्यात अवकाळीचा इशारा (Maharashtra Unseasonal Rain)
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट द्यI pic.twitter.com/96iH8CJPUU
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 29, 2023
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठका
मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज महत्त्वाच्या बैठका बोलवल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक, मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मान्सूपूर्व कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मान्सूच्या पार्श्वभूमीवर या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.