एक्स्प्लोर
मोदींची अवस्था 'गजनी' तील आमीर खानसारखी : धनंजय मुंडे
जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत. या लाटेने राज्याचे किती वाटोळे झाले हे आपण अनुभवत आहोत, असेही मुंडे म्हणाले.
पालघर : पाच वर्षांत मोदींनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था आज गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगड येथील सभेत केली. जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत. या लाटेने राज्याचे किती वाटोळे झाले हे आपण अनुभवत आहोत, असेही मुंडे म्हणाले. विक्रमगड येथे निर्धार परिवर्तनाचा या सभेत ते बोलत होते.
चार वर्षे झाली सत्तेत येवून परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र केला नाहीत. उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केले असा आरोप धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. चार वर्षात महाराष्ट्र लुटला आहात त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही असेही मुंडे म्हणाले.
आज 2014 च्या निवडणुकीतील मोदींनी केलेली भाषणे आणि आजची त्यांची भाषणे ऐकल्यानंतर गजनी सिनेमाची आठवण येते. नरेंद्र मोदींची अवस्था गजनी सारखी झाल्याची टीका मुंडे यांनी केली. मुंडे पुढे म्हणाले की, जीवनावश्यक वस्तुंचे भाव एवढे वाढलेत. हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही.
सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आमची ताई तर लहान मुलांची चिक्कीच खाऊन गेली अशी टीका त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
राज्यातील आदिवासींना भाजप वनवासी समजतंय : छगन भुजबळ
आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुस्कटदाबी, दादागिरी सुरु आहे. कुणी काय खायचं आणि कसं लिहायचं हे यांनी ठरवायचं. त्यामुळे आता फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे, अशी भीती भुजबळ यांनी व्यक्त केली. आपल्या सोबत मन की बात आणि अदानी-अंबानी सोबत धन की बात असे बोलत नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला असा आरोपही भुजबळ यांनी केला.
पोकळ वाशासारखी सरकारची अवस्था : अजित पवार
घर आहे पोकळ वासा, वारा जाई फसफसा अशी अवस्था या सरकारची झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली. प्रधानमंत्री जनधन,सुकन्या, मुद्रा, आवास, फसलविमा, ग्रामसिंचन, सुरक्षा, उज्ज्वला, दीनदयाळ, अमृत आहार इतक्या योजना या सरकारने आणल्या परंतु याचा फायदा किती झाला, काय मिळालं जनतेला असा सवालही पवार यांनी जनतेला केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे परंतु केंद्राने एक रुपयाही राज्याला दिला नाही. याविषयी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी आले परंतु या पथकाने रात्रीची पाहणी केली अशी रात्रीची पाहणी कुणी केली होती का असा सवाल पवार यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement