एक्स्प्लोर

'प्रवाशांच्या सोयीसाठी'.... प्रत्येक एसटी बसमध्ये आगारप्रमुख, विभागप्रमुखांचे नंबर झळकणार

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असं ब्रीदवाक्य असलेलं एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवत असतं. आता प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन एसटी बसमध्ये आगारप्रमुख, विभागप्रमुखांचे नंबर झळकणार आहेत. तसे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई : प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्या विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब म्हणाले की, दररोज एसटीने सुमारे 67 लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. एसटीच्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये काम करीत असताना 'ग्राहकाचे महत्तम समाधान' हेच ‍अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे, असं परब यांनी म्हटलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी'.... प्रत्येक एसटी बसमध्ये आगारप्रमुख, विभागप्रमुखांचे नंबर झळकणार परब म्हणाले की, ग्राहकाच्या तक्रारी,समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे आणि अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्वाचे आहे,असे ही ते म्हणाले. एसटी बसमध्ये आगार प्रमुख आणि विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच निर्गमित करण्यात येत असल्याचं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Virar News: कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Embed widget