Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरेंना कोरोनाची लागण
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मुंबई महापालिकेने देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण आहे. झालेय. तसंच राज यांच्या घरी घरकाम करणआऱ्या महिलेलाही कोरोना संसर्ग झाला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज ठाकरे यांना कोणतीही लक्षणं नसून ते आणि त्यांच्या मातोश्री अशा दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय .राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींनिमित्त मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा काल पुढे ढकलण्याच आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी मास्क न घातल्याबद्दल राज ठाकरेंना पत्रकारांनी सवाल केला होता. तेव्हा राज ठाकरेंनी आपण मास्क लावतच नाही असं म्हंटलं. याशिवाय नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही राज ठाकरेंनी मास्क काढायला लावला होता. राज ठाकरे अनेकवेळा विनामास्क दिसले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न घालण्याचं कारण विचारलं असता मी मास्क घालत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना आणि घरी घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.























