(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajendra Raut : '...तर बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईन', छाती बडवत आमदार राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगेंना दम भरला
Rajendra Raut on Manoj Jarange: मराठ्याच्या छाव्याला डिवचायचा प्रयत्न केला तर आमचं घराणे हे मराठे आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे, अशा शब्दात राऊतांनी मनोज जरांगेंना लक्ष्य केलं आहे.
सोलापूर: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमदारांना काहीही बोलता, मी तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दल ही काहीही बोललात हाच का तुमचा सुसंस्कृतपणा आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आपल्याला शिवरायांनी हीच शिकवण दिली का? असा रोखठोक सवाल आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) केला आहे.
बार्शीतील मराठ्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारत आहेत, म्हणून तुम्हाला झोंबल असेल आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कुटुंबावर ही बोलत आहात अशा शब्दात राऊत यांनी जरांगेंना (Manoj Jarange) लक्ष्य केलं आहे. माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणाला राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचा पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतीची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल अशा शब्दात त्यांनी जरांगेंना (Manoj Jarange) आव्हान दिलं आहे.
त्याचबरोबर जर ह्या मराठ्याच्या छाव्याला डिवचायचा प्रयत्न केला तर आमचं घराणे हे मराठे आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होतील याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल, माझं डोकं तुम्ही फिरवू नका. मी जर मराठ्यांची गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईन, प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजा राऊतचं चॅलेंज आहे, कोण मराठा बोलत नव्हता पण हा पठ्या बोललाय आज, किती तुकडे व्हायचे आणि किती करायचे याचं भान मला ही राहणार नाही अशा शब्दात छाती बडवत आमदार राजेंद्र राऊत (Manoj Jarange) यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांना दम भरला आहे.
इमानदारीने आलात तर पन्नास लाख रुपये खर्चून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी या राजेंद्र राऊतची असेल आता यापूढे तुम्ही आहे आणि मी आहे, जमलीच आता असं म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना खुलं आव्हान दिलं आहे.
मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, जरांगेंचं वक्तव्य राऊत यांचा दावा
"आम्ही जरांगेंसोबत बैठकीला बसलो होतो, त्यावेळी उदयन महाराजांचा विषय निघाला. जरांगे म्हणाले, थोडक्या मतांनी निवडून आले. मला त्यादिवशी खऱ्या अर्थाने धक्का बसला होता. मी माझ्या देवाची (शिवाजी महाराज) शपथ घेऊन सांगतो. तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंचं वाक्य आहे की, मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते", असा दावा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला. ते बार्शीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राऊतांच्या दाव्यावर जरागेंचं उत्तर
आमदार राजेंद्र राऊत यांनी 'मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते. हे विधान मनोज जरांगेंनी केलं आहे.' असा गंभीर आरोप केला होता. यावरून मनोज पाटील यांनी राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देताना फटकारलं आहे.'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याची खेळी करत आहेत. राजेंद्र राऊत यांनी पोपटपंची करू नये', असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे. ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाहीत', असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.