एक्स्प्लोर
VIDEO : आमदार प्रणिती शिंदेंची भर रस्त्यात घोषणाबाजी
गेल्या आठवड्यात सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे दोघांचा बळी गेला. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरु करत, शहरातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
सोलापूर : जड वाहतुकीच्या विरोधात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक रुप धारण करत, त्यांनी भर रस्त्यात घोषणाबाजी केली. ‘जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचाssss निषेध’ अशा घोषणांनी प्रणिती शिंदेंनी सारा परिसर दणाणून सोडला.
गेल्या आठवड्यात सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे दोघांचा बळी गेला. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरु करत, शहरातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
प्रणिती शिंदे यांनी अशोक चौकात सुरु केलेल्या आंदोलनादरम्यान जड वाहने अडवली, त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुख्य रस्त्यावर सायकली लावून प्रणिती शिंदेंनी रस्ता रोको केला.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement