नितीन देशमुखांची जीभ घसरली, रवी राणांबद्दल बोलताना अपशब्दाचा वापर, बायकोचाही केला उल्लेख
Nitin Deshmukh: भाजपनेते किरीट सोमय्या यांची संपत्ती मीच घेऊन दिलेली आहे. त्यांचा बंगलाही मीच घेऊन दिल्याचा तिरकस टोला अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावलाय.
Nitin Deshmukh: एसीबीची नोटीस आल्यानंतर शिवसेना नेते नितीन देशमुख चर्चेत आहेत. नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांच्यासह किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. रवी राणांवर टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली. रवी राणांबद्दल बोलताना नितीन देशमुख यांनी अपशब्दाचा वापर केलाय. तसेच बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा, असाही उल्लेख केला. रवी राणा यांच्या टीकेला उत्तर देताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली.
एसीबीचा नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांना केलंय. यावर आमदार नितीन देशमुख यांनी राणांना सडेतोड उत्तर दिलंय. आमदार रवी राणांच्या विधानावर बोलतांना आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरलीय. नेमकं काय बोललेय आमदार नितीन देशमुख पाहूयात...
ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रवी राणांच्या टीकेला बोलताना म्हणाले की, रवी राणा नेमका आहे कुठला?. त्याची पैदास कुठली? हेही महाराष्ट्रातील कुणाला माहिती नाहीये. रवी राणा हा ****खोर आहेय. तो बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा आहे. मी त्याच्यासारखं बायकोच्या भरवशावर राजकारण करीत नाही. मतदारच आगामी निवडणुकीत राणाला त्याची जागा दाखवणार.. बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार अन् त्यातून त्याला धडाही शिकवणार असे म्हणत आमदार नितीन देशमुखांनी राणांना त्याच्याच मतदारसंघात घेरण्याचे दिले संकेत.
सोमय्यावरही टीकास्त्र -
भाजपनेते किरीट सोमय्या यांची संपत्ती मीच घेऊन दिलेली आहे. त्यांचा बंगलाही मीच घेऊन दिल्याचा तिरकस टोला अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावलाय. आमदार नितीन देशमुख हे अकोला येथे 'एबीपी माझा'शी विशेष बातचित करताना बोलत होते. माझी बेहिशेबी मालमत्ता कोणती?, ते एसीबीनं स्पष्ट करावं असे आव्हान आमदार नितीन देशमुखांनी सरकार आणि एसीबीला दिलं आहे. या मुलाखतीत नितीन देशमुखांनी अनेक गौप्यस्फोट केलेय.
किरीट सोमय्यांची प्रॉपर्टी, घर माझे आहे. ते एसीबीनं ताब्यात घेवून मला परत करावं. मी बेहिशेबी मालमत्ता जमवून चुकीचं केलं तर मी जेलमध्ये जायला तयार. परंतू, एसीबी आरोप करीत असलेली कथित बेहिशेबी मालमत्ता मला मिळाली तर माझ्या मुलाचं भलं होईल. माझ्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तक्रार करणारा हा हिस्ट्रीशिटर. त्याच्यावर फसवणुकीचे, विनयभंगाचे गुन्हे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई आहे. याच कथित हिस्ट्रीशिटर तक्रारकर्त्यासोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बातचित. आपल्याकडे या संभाषणाची ऑडियो क्लीप. आपल्यावरच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचीच फुस आहे. मी एसीबी आणि माध्यमांसमोर 'लाईव्ह' सांगायला तयार आहे, असे नितीन देशमुख म्हणाले.
आणखी वाचा:
मुख्यमंत्री आणि तक्रारदाराच्या फोन संभाषणाची क्लिप माझ्याकडे, नितीन देशमुखांचा खळबळजनक दावा