Bacchu Kadu : बच्चू कडू संतापले, कामातील त्रुटीवरून अभियंत्याला झापलं
Amravati News Update : आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच एका विकास कामाची पाहणी केली. यावेळी कामातील त्रुटींवरून अभियंत्याला चांगलंच झापलंय.
![Bacchu Kadu : बच्चू कडू संतापले, कामातील त्रुटीवरून अभियंत्याला झापलं mla bacchu kadu unhappy with work slams irrigation engineer on work at amaravati Bacchu Kadu : बच्चू कडू संतापले, कामातील त्रुटीवरून अभियंत्याला झापलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/29/add3acad6ebb113fef83045e19ef62bc1675002332318328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati News Update : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाला खोलीकरणाच्या कामावरून अभियंत्याला चांगलंच झापलंय. बच्चू कडू यांनी नुकतीच एका विकासकामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना नाला खोलीकरणाच्या कामात मोठी तफावत आढळून आली. यावरून त्यांनी अभियंत्याला चांगलेच धारेवर धरले. अभियंते असूनही तुम्ही कामावर लक्ष देत नाही, चकरा मारत नाही, शासनाचा निधी एवढा अपव्य होत आहे, कसा भयाळपणा करता. कोणत्या शाळेत शिकतात? अशा प्रश्न विचारून बच्चू कडू यांनी अभियंत्याला चांगलेच झापले.
अमरावतीमधील अचलपूर मतदारसंघातील चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथे जलसंपदा विभाग अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून पूर संरक्षण योजनेंतर्गत बोहर्डा नदीपात्रात पूर संरक्षिक भिंतींचे काम सुरू आहे. या कामाची आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कामातील काही तांत्रिक बाबींवरून अभियंत्यांना चांगलेच सुनावले. शिवाय या कामातील त्रुटींवरून शंका देखील व्यक्त केली. नदीपात्रातील एका बाजुची संरक्षक भिंत पाहून त्यांनी नदीच्या पाण्याचा प्रवाह योग्य होणार नाही असे सांगत संबंधित अभियंत्यांना सूचना देखील केल्या.
बच्चू कडू यांचा नुकताच रस्ता ओलांडताना अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्यामुळे त्यांच्यार काही दिवस रूग्णालयातच उपचार सुरू होते. अलीकडील काही दिवसांपूर्वीच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे परिसरातील कामांची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना या कामात काही तृटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं.
दरम्यान, यापूर्वी देखील बच्चू कडून यांनी अनेकवेळा कामांमधील त्रुटींवरून अधिकाऱ्यांना झापल्याची अनेक उदाहरणे आहेत.
महत्वाच्या बातम्या
Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची अपेक्षा पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवली; काय म्हणाले पाहा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)