एक्स्प्लोर
आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
अभिनेते आदेश बांदेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय झाले आहेत. सध्या बांदेकर यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.

मुंबई : शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर आहेत.
अभिनेते आदेश बांदेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय झाले आहेत. सध्या बांदेकर यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.
अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या आदेश बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेतही त्यांना वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास देण्यात आल्या.
दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश सरकारकडून आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारनेही काही महिन्यांपूर्वी पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यात भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. मात्र यातील भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाकारला होता.
संबंधित बातम्या :
आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी
भय्यू महाराजांसह पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
