मंत्री पदापेक्षा माऊलींच्या सेवेत जास्त आनंद, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य, ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन
साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते असे वक्तव्य मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
Jayakumar Gore : साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. राज्याचा मंत्री होताना जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद माऊलींची आणि विठुरायाची सेवा करण्यात मिळाल्याचेही यावेळी गोरे यांनी सांगितले.
मंत्री गोरे यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग-सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार अभिजीत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील, ह.भ.प. बंडा तात्या कराडकर व ज्ञानेश्वरी चे अभ्यासक उपस्थित होते.
साडेसातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार आजही समाजाला ऊर्जा देतात
पालकमंत्री गोरे यांनी पंढरपूर ही संतांच्या विचारांनी प्रेरित झालेली भूमी आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन करण्यासाठी राज्यभरातील अभ्यासक एकत्र येत आहेत, ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सांगितले. यंदाच्या आषाढी वारीची चर्चा तर दिल्लीपर्यंत झाली पण वर्षानुवर्षे वारी करणाऱ्या वारकऱ्यां कडून वारी चांगली झाल्याच्या मिळालेल्या प्रतिक्रिया या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचे असल्याचे गोरे यांनी सांगितले. साडेसातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार आजही समाजाला ऊर्जा देतात. मंत्री पदापेक्षा माऊलीच्या सेवेत जास्त आनंद मिळत असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग-सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले आहे. याकार्यक्रमाला सोलापूर जिलह्याचे पालकमंत्री उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार अभिजीत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह इतर लोक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
























