Action Against MSEB Officer : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्र्यांनी उगारला कारवाईचा बडगा
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
Action Against MSEB Officer : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेश देखील राऊत यांनी दिले आहेत. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नितीन राऊत यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
दरम्यान, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सुनिल प्रभु, आमदार अबू आजमी, आमदार सुभाष धोटे. आमदार अमित झनक आणि आमदार बळवंत मानखेडे यांनी विधानसभेत याबाबत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा कठोर संदेश डॉ. राऊत यांनी दिला आहे.
नेमके आरोप काय ?
शासनाच्या महिवितरण कंपनीमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असलेले सुमित कुमार यांच्याकडून महावितरणमधील मिटर रिडींग, एजन्सी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर पैशाची मागणी करीत असणे, विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे, या धमकीची रेकॉर्डिंग क्लिप उपलब्ध असूनही ठोस कारवाई न होणे, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करुन मुख्य तपास अधिकारी पद मिळवणे असे विविध आरोप यामध्ये करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्यासाठी त्यांना निलंबीत करुन त्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामार्फत चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे आमदारांनी लक्षवेधीत म्हटले होते. तसेच यापूर्वी शासनाकडे 9 नोव्हेंबर 2020 ला तत्कालीन संचालक दिनेशचंद्र साबु यांचे बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांचीहा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामार्फत चौकशी करण्यात न येणे, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं शासनाने याप्रकरणी तातडीनेचौकशी करुन दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- शेतकऱ्याला बोनस ऐवजी प्रति एकर मदत विचाराधीन; धान उत्पादकांचे थकीत 600 कोटी तात्काळ देणार; अजित पवारांची घोषणा
- sugarcane FRP : उसाला एकरकमी FRP द्यावी; अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू, सदाभाऊ खोत आणि पडळकरांचे आंदोलन