...तर जीव दिला असता पण रेल्वेचा डब्बा बनवण्याचा कारखाना लातूरला जाऊ दिला नसता: धनंजय मुंडे
राज्यात भाजपची सत्ता असतानाही रेल्वेचा डबा बनवण्याचा कारखाना बीडऐवजी लातूरला गेला. आम्ही जर सत्तेत असतो, तर जीव गेला असता तरी बेहत्तर पण हा कारखाना जिल्ह्याबाहेर जाऊ दिला नसता असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde : एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विकासकामांचे धूम धडाक्यात उद्घाटन करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र ही विकासकामे आमच्या काळात मंजूर झाली होती असा सातत्याने आरोप करत आहेत. मात्र, या आरोपांचे धनंजय मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरून खंडन केले आहे. देशात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना, रेल्वेचा डबा बनवण्याचा कारखाना बीडऐवजी लातूरला गेला. आम्ही जर सत्तेत असतो, तर जीव गेला असता तरी बेहत्तर पण जिल्ह्याच्या सरहद्दीबाहेर हा कारखाना जाऊ दिला नसता असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
आष्टी शहरातील पंचायत समिती नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा आणि विकास कामाचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा लगावला. आम्ही सत्तेत असतो तर जीव गेला असता तरी बेहत्तर पण बीड जिल्ह्याच्या सरहद्दी बाहेर हा कारखाना जाऊ दिला नसता, असे मुंडे यावेळी म्हणाले. मागासलेपनात आमच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या पण सत्तेचा वापर हा मागासलेपण दूर करण्यासाठी झाला नाही, अशी खंत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. एवढी सत्ता होती तरीही पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे मागासलेपण घालवता आले नाही असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
जिल्ह्याला बदनाम करू नका
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका आधिकार्याने स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूलचा परवाना प्रशासनाकडे मागितला होता. यावर पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यामध्ये माफियाराज आल्याचे सांगितले होते. यावर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी हात जोडून जाहीर व्यासपीठावरून विनंती केली आहे. विरोधक बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम करत आहेत. जिल्ह्याची बदनामी झाल्यामुळे जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर वैयक्तिक माझ्यावर टीका करा पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करु नका असे आवाहन धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केले. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची बदनामी केली. हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. कारण ते संबंध देशाचे प्रमुख आहेत. आपल्याला आपल्या मातीचा अभिमान असला पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
