एक्स्प्लोर

मंत्री बच्चू कडूंची अकोला लॉकडाऊनची घोषणा, मात्र काही तासातच यू-टर्न

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून अकोल्यात थेट लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आपल्या भूमिकेत घुमजाव करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

अकोला : कोरोनानं सैरभैर झालेल्या अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी 'लॉकडाउन'चा निर्णय जाहीर केला होता. 1 ते 6 जूनदरम्यान अकोला शहरात संपूर्ण 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना जाहीर केला होता. मात्र, आपल्याच घोषणेनंतर सहा तासांत पालकमंत्री बच्चू कडूंनी चक्क 'यू-टर्न' घेतला. आता पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या परवानगीनंतर अकोल्याचे जिल्हाधिकारी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, असं जाहीर केलंय. त्यामुळे सरकारशी कोणतीही चर्चा न करता घोषित केलेल्या अकोल्यातील 'लॉकडाऊन'चा निर्णय पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतला होता. स्थानिक स्तरावर स्वतंत्र आदेश काढता येणार नाही, असे राज्य सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्याकडे दुर्लक्ष करून थेट लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आपल्या भूमिकेत घुमजाव करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. 1 ते 6 जूनपर्यंत जनता कर्फ्यू करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आम्ही राज्य सरकारची परवानगी घेऊ. परवानगी आल्यानंतर जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी घोषणा करतील, असं कडू यांनी म्हटलं आहे. अकोला विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' झालं आहे. गुरूवारी रात्रीपर्यंत अकोल्यात कोरोनाचे 516 रूग्ण झालेत. तर 28 लोकांचा बळी कोरोनाच्या आजारानं घेतलाय. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं अकोलेकर कोरोनाच्या भयानं सैरभैर झाले आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या 'बैठक-बैठक' खेळात अकोला विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' ठरलं. एरव्ही अकोल्यात फक्त बैठकांपुरतेच मर्यादीत पालकमंत्री बच्चू कडू एकदम जागे झाले आहेत. गुरूवारच्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी अकोल्यात 1 ते 6 जूनदरम्यान शहरात संपूर्ण 'लॉकडाउन'चा निर्णय जाहीर केला. दुपारी तीनच्या सुमारास पालकमंत्री बच्चू कडूंनी 'माझा'शी बोलतांना ही माहिती दिली होती. पालकमंत्र्यांनी तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी निर्णय तर घेतला खरा. मात्र, हे करतांना राज्य सरकार आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी त्यांनी यासंदर्भात चर्चाच केली नसावी. कदाचित त्यामुळेच त्यांना 'यू-टर्न' घ्यावा लागला असावा. अन् मग त्यांचं पुढचं वक्तव्य 'विचारू-पाहू-करू' या प्रकारातलं  होतं. विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' अकोला असणं हे येथील प्रशासनाचं अपयश आहे. त्याआधी ते पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांचंही तितकंच मोठं अपयश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget