एक्स्प्लोर

शरद पवार देशात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत, अमित शाह यांची टीका 

शरद पवार अनेक वर्ष देशात मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. मात्र, ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Amit Shah on Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं काम सुरु केलं होतं. त्यांनी जलयुक्त शिवार सुरु केल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. आता या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने ते दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याचं काम करतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार अनेक वर्ष देशात मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. मात्र, ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत असे म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पुढच्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत येण्यापीर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळेल असेही शाह म्हणाले.

2024 हे वर्ष भाजपसाठी महत्वाचं, इतिहासात नोंद होईल

2024 वर्ष हे भाजपसाठी चांगलं राहीलं असल्याचे अमित शाह म्हणाले. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा जिंकली आहे. 2024 वर्ष हे महत्वाचं वर्ष आहे, याची इतिहासात नोदं केली जाईल असे ते म्हणाले. आम्ही थकणारे नाही. महाराष्ट्रात 40 लाख सदस्य बनले आहेत. एकूण दिड कोटी सदस्य बनवायचे आहेत. दिड महिन्यात पुढे जायचं आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही याची चिंता करा असेही अमित शाह म्हणाले. सर्वच ठिकाणी भाजप असली पाहिजे. 

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष असली असल्याचं दाखवून दिलं

सिद्धांताच राजकारण करण्याच काम केलं आहे. परिवारवादाला फटकारलं असल्याचे अमित शाह म्हणाले. लाडकी बहिण योजना आणि शेतकरी यांना धन्यवाद देतो. शरद पवार पत्रकारांना शिकवत होते. आता मी शरद पवार यांना शिकवतो. कुठे किती जागा जिंकल्या. तिकीट वाटपात काहीजण नाराज झाले मात्र तरीही कमळ आणि महायुतीला मदत केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष असली असल्याचं दाखवून दिल्याचे अमित शाह म्हणाले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्याला विजय मिळवायचाय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा असल्याचे शाह म्हणाले.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढून एवढं बहूमत आलं आहे. त्यांनी मोठं काम केलं आहे. तु्म्हीही किती मोठं काम केल आहे, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं आहे. खरी शिवसेना आणि सच्ची राष्ट्रवादी याचाही विजय झाला आहे. शरद पवार यांनी राजकारणात जे केलं होतं त्याला 20 फुट दफन करण्याच काम तुम्ही केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केलं होत त्यांना अद्दल घडविण्याचं काम तुम्ही केल्याचे शाह म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget