एक्स्प्लोर
वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी
आज समेट झाल्यानंतर वढू गावातील दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
पुणे : भीमा कोरेगावप्रकरणी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये पुण्यातील वढूमध्ये आज पुन्हा बैठक झाली. यामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्यावर दोन्ही गटांचं एकमत झालं. तर गोविंद महाराजांची समाधी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापुढे गावातील निर्णयांमध्ये गावाव्यतिरिक्त लोक हस्तक्षेप करणार नसल्याचंही निश्चित करण्यात आलं. आज बैठक झाल्यानंतर वढू गावातील दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
गेले काही दिवस महाराष्ट्रात सुरु असलेल्या वादाच्या केंद्रस्थानी आहे पुणे जिल्ह्यातील वढू गाव. या गावात 29 तारखेला झालेल्या वादाचं रुपांतर पुढे गोविंद महाराजांच्या समाधीच्या छत्रीची मोडतोड करण्यात आणि त्यानंतर गावकऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होण्यामध्ये झाला. मात्र आता दोन्ही बाजूंनी एकोप्याने राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गोविंद महाराजांची समाधी बांधून देण्याचा निर्णय गावाने एकमुखाने घेतला, तर दुसरीकडे अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे यापुढे गावातील सर्व निर्णय गावातील लोकच घेतील. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा त्यामधे हस्तक्षेप असणार नाही किंवा बाहेरील कोणी व्यक्ती गावातील कोणत्या संस्थेमध्ये सहभागी देखील असणार नाही.
छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गोविंद महाराजांची या गावात समाधी आहे. आज समेट झाल्यानंतर वढू गावातील दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement