एक्स्प्लोर
माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला भर रस्त्यात भीषण आग
आगीचे वृत समजताच मालेगाव तालुका पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आग विझविण्याचे काम सुरु झाले. अखेर तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मनमाड : मनमाडमध्ये माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या घटनेमुळे मनमाड-मालेगाव मार्गावरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती.
मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडी-जळगावच्या घाटाजवळ माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्य स्थानी पडला.
आगीचे वृत समजताच मालेगाव तालुका पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आग विझविण्याचे काम सुरु झाले. अखेर तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, या घटनेमुळे मनमाड-मालेगाव मार्गावरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. सध्या वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement