एक्स्प्लोर
Advertisement
शहीद नितीन कोळींचं पार्थिव पुणे विमानतळावर दाखल
सांगली : कुपवाड्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर मूळगावी म्हणजे सांगलीतल्या दुधगावमध्ये कोळी यांचं पार्थिव नेण्यात येईल.
नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी संपूर्ण दुधगाव लोटलं आहे. सकाळी नितीन कोळी यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगर येथील लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं.
मूळ सांगलीचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. ते सध्या बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं संरक्षण करत होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे. शहीद कोळी यांच्या परिवाराला राज्य सरकारनं 15 लाखांची मदत जाहीर केली आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद
माछिल सेक्टरमध्ये सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी यांना वीरमरण आलं. कठुआ, माछिलसह अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. ज्यात प्रामुख्यानेसीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं जातं आहे. कठुआ भागात तर पाकिस्ताननं थेट तोफांचाही मारा केल्याचं वृत्त आहे. भारतीय जवानही पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहेत.पाकच्या डझनभर चौक्या उद्ध्वस्त, वॉच टॉवरही पाडले
दरम्यान, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार, भारताचं चोख उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement