एक्स्प्लोर
Advertisement
धाकटा भाऊ दाखवून थोरल्याशी लग्न लावलं, लातुरात गुन्हा दाखल
लहान भावाच्या नोकरीची कागदपत्रे दाखवून मोठ्या भावाशी लग्न लावल्याचा प्रकार अहमदपूर येथे समोर आला आहे. फसवणूक लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
लातूर : लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार आजवर समोर आले आहेत. लातूर जिल्ह्यातही एक असाच धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लहान भावाच्या नोकरीची कागदपत्रे दाखवून मोठ्या भावाशी लग्न लावल्याचा प्रकार अहमदपूर येथे समोर आला आहे. फसवणूक लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर येथील एका तरुणीला देगलूर येथील जयेंद्र जाधव या तरुणाचे स्थळ आले होते. तरुणाच्या घरच्यांनी जयेंद्रचेच नाव विजेंद्र असेही असल्याचे सांगितले. विजेंद्र जाधव या नावाची शैक्षणिक कागदपत्रे दाखवली. तसेच, मुलगा पुण्यात नोकरीस असल्याचे सांगितले. यावर मुलीकडच्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर, 10 डिसेंबर 2018 ला दोघांचे लग्न लावण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लग्नानंतर मुलीच्या लक्षात आले. वास्तविक विजेंद्र हा जयेंद्रचा लहान भाऊ असून, जयेंद्र हा कमी शिक्षीत आहे.
त्यानंतर मुलीने अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या महिन्याभरापासून तरुणीस सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच, तिच्याकडे 25 लाखांची मागणी केली जात असल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी जाधव कुटुंबीयांकडे विचारणा केली असता, तुमच्या मुलीस घरातून हाकालून दिल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement