Marathwada Rains: जालना, यवतमाळ, हिंगोलीसह परभणीत तुफान पाऊस; वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी
Marathwada Rains : मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडतोय. जालना, यवतमाळ, हिंगोलीसह परभणीत पावसानं धुमाकूळ घातला आहे.
Marathwada Rain Updates : इथे मुंबई (Mumbai Rains), पुण्यात पावसानं (Rain Updates) दडी मारली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात (Marathwada Rain) मात्र, जणू आभाळ कोसळल्यागत धो-धो पाऊस पडतोय. या अतिवृष्टीता हिंगोली (Hingoli), यवतमाळ (Yavatmal), वाशिम, परभणी (Parbhani), नांदेडला मोठा फटका बसला आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झालीय. दुकानं- शेतशिवारात पाणी शिरल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. जालन्यात तर पावसानं कहर केला आहे. जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळत आहे. येथील पांगरी, पाटोदा, सांगवी गावासह 5-6 गावामध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर, गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
परभणीवर वरुणराजाची कृपादृष्टी
परभणी जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील पाणी प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे. लोअर दुधना प्रकल्पात जवळपास 34 टक्के तर येलदरीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येलदरी प्रकल्प 51 टक्क्यांनी भरलं आहे. लोअर दूधनाही 61.93 टक्के भरलं आहे. दरम्यान, दुधना आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. दुधना आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टीसदृश पाऊस
जालना मंठा तालुक्यात अतिवृष्टीसदृश पाऊस कोसळत आहे. मंठामधील पांगरी, पाटोदा, सांगवी गावासह 5-6 गावामध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे. पांगरी गावचा संपर्क तुटल्यामुळे, गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं आहे. पांगरी आणि गावात पाझर तलाव पूर्ण क्षमेतेनं भरल्यानं तो फुटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. गावातील कुटुंबाला जवळच असलेल्या उंचावरील मंदिरासह इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणाचे धनंजय मुंडेंचे आदेश
पावसाचा जोर ओसरल्यावर पंचनामे करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहेत. बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून अनेक भागांत शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
वाशिममध्ये मुसळधार
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला आहे. जयपूर-शहा गावाच्या लगत असलेल्या पुलावरुन पावसाच्या पुराचं पाणी असल्यानं दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीही एका वयोवृद्ध आजोबांनी नसतं धाडस करुन पुलावरुन जीवघेणा प्रवास केला. मात्र, हे धाडस आजोबांच्या जीवावर बेतता बेतता राहिलं. पुलावरुन पाणी वाहताना आजोबांनी चालत चालत पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह गतीमान असल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. आजोबांना ओढ्यात वाहून जाताना दोन्ही बाजूला पुलावर उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांनी पाहिलं आणि तात्काळ ओढ्यात उड्या घेतल्या. ग्रामस्थांनी धावपळ करत अर्धा किलोमीटर दूरपर्यंत जाऊन आजोबांना वाचवलं आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये, असं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं आहे. सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87 टक्के आहे. जायकवाडीतून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोलीत पूरस्थिती
जोरदार पावसामुळे हिंगोली शहरांमध्ये काल दाना दान झाली होती. शहरातील बांगर नगर भागात मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरला होता, तर अनेक दुकान मॉल यासह अनेकांच्या घरात सुद्धा हे पाणी शिरलं होतं. बांगर नगर भागात आणि जवळपासच्या परिसरामध्ये काल सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं या पाण्यामध्ये स्कूलबस अर्ध्याहून अधिक बुडाल्या होत्या त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत होतं आता हा पूर ओसरला आहे आणि त्यानंतर नुकसानीची दाहकता समजू लागली आहे अनेकांच्या दुकानांमध्ये घरामध्ये पाणी शिरला आहे. त्यामुळे घरातील संस्वर उपयोग साहित्याचे नुकसान झाला आहे. आता या ठिकाणची नागरिक घरामध्ये शिरलेले पाणी बाहेर काढत आहेत, तर घरात सासलेला चिखलसुद्धा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.