एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा, आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल 

महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा सक्तीची करा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी माय मराठीवर लक्ष दिले पाहिजे असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut :  महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा सक्तीची करा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी माय मराठीवर लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा कागदावर सक्तीची झाली असेल. जोपर्यंत मराठी भाषा सक्तीचे होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळणार नाही असे राऊत म्हणाले. मराठी विषयी भाजपाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलं आहे का? महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या लोकांचं योगदान नाही, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली. बेळगावत मराठी भाषेवर इतका अत्याचार होतं असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केलं आहे का? असा सवाल राऊतांनी केला. 

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना इंग्रजी येत नाही म्हणून आमच्यावर हिंदी लादू नका 

हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना इंग्रजी येत नाही म्हणून आमच्यावर हिंदी लादू नका असे राऊत म्हणाले. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करु नका असे राऊत म्हणाले. देशात हिंदीविषयी आस्था व प्रेम आहे, संवाद भाषा आहे ती पण अभ्यासक्रमात सक्ती नको असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे असे राऊत म्हणाले. 

 मराठी राजभाषा आहे तिच्या डोक्यावर राजमुकुटाचा हवा 

कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात. कुठल्यातरी सागर बंगल्यावरुन ते ट्विट तयार करुन आलं होतं इतकी तत्परता असू शकते असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लागवला. विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा असेही राऊत म्हणाले. कुठून तरी आलेला स्क्रिप्ट वाचू नका, तुम्ही कधी हिंदू झालात कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा असेही राऊत म्हणाले. राज ठाकरे यांच्या निवेदनाबद्दल देखील राऊतांना विचारण्यात आलं, यावेळी राऊत म्हणाले की, हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा त्यांच्या संगनमताने नाटक चालले आहे, त्यांना परत चहाला बोलवा असे राऊत म्हणाले. मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा, मराठी राजभाषा आहे तिच्या डोक्यावर राजमुकुटाचा हवा असे राऊत म्हणाले. फडणवीसांचे नेते घाटकोपरला गेले आणि त्या ठिकाणी बोलले की घाटकोपर ची भाषा गुजराती आहे त्यावर बोलला नाहीत तुम्ही. हा सगळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा डाव चालला आहे. फडणवीस यांना मराठी भाषा हिंदी भाषेविषयी प्रेम असल्याचे कारण नाही. बाळासाहेबांची भूमिका काय होती? एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तुम्ही फडणवीस यांची भूमिका मान्य करत आहात का? असा सवालही राऊतांनी केला. 

ओरिजनल शिवसेना विरोध करतेय

ओरिजनल शिवसेना विरोध करते आहे. देशाच्या राजधानीत हिंदीत बोलायचं हे आम्ही ठरवलं आहे. त्या लेवलला येण्यासाठी फडणवीसांना अभ्यास करावा लागेल असे राऊत म्हणाले. लोकसभा विधानसभेत त्यांनी हिंदू मुसलमान केलं, पालिकेमध्ये ते आता प्रांतवाद करणार राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत, ते असे सुपाऱ्या घ्यायचे प्रयत्न करतात. पण मराठी नागरिक सुज्ञ आहेत असे राऊत म्हणाले. सिंधुदुर्गात जो खून झालेला आहे त्यासंदर्भात अद्याप काही कारवाई झालेली नाही. बीड तर हातातून गेलेलाच आहे पण सिंधुदुर्गमध्ये दिवसाढवळ्यात जे कोण हत्या अपहरण सुरू आहे तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे असे राऊत म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Hindi Language in Marathi School: पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला शिक्षणतज्ज्ञांचा विरोध, राज्य सरकारच्या सुकाणू समितीमधील सदस्यानेच दंड थोपटले

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 
उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
Embed widget