Raj Thackeray : 'भाषा' हीच तुमची ओळख! मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची सडेतोड मुलाखत
Raj Thackeray : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये राज ठाकरेंच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
Raj Thackeray : भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिकवल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केलं. मी प्रेमाची पुस्तक वाचत नाही. तो प्रेम करतोय मी कशाला वाचायचं असे ठाकरे म्हणाले. मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात असेही राज ठाकरे म्हणाले. जगात भाषेने तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) पनवेलमध्ये (Navi Mumbai) राज ठाकरेंच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
व्यंगचित्रामुळे वाचन वाढलं
आपण वाचलं पाहिजे नाहीतर विचारांचा तोकडेपणा येतो. मी मराठी आहे. यापेक्षा मी मराठी बोलणारा माणूस आहे हे कळले पाहिजे. त्यावरुन तुम्ही कोण आहेत हे कळतं असेही राज ठाकरे म्हणाले. तुम्ही मराठी भाषा बोलणारा माणूस आहेत. भाषेने तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. व्यंगचित्रामुळे माझं वाचन वाढल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऐतिहासिक लेखन वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आपल्या पूर्वजांना समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत. शिवरायांचे चरित्र वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
पुतळे उभे करुन उपयोग नाही, गडकिल्ले जपले पाहिजेत
जयंती, पुण्यतिथी आली की फक्त पुतळे धुतले जातात. फक्त पुतळे उभ करुन उपयोग नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. इंदू मिल इथे स्मारक उभार करत आहेत. तिथे जागतिक दर्जाचं ग्रंथालय झालं पाहिजे. समुद्रात महाराजांचे स्मारक उभं करण्यापेक्षा गडकिल्ले जपले पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे मला इतिहास कसा वाचायचा? काय वाचायचा? कसे वागायचे हे कळाल्याचे राज ठाकरे म्हणाले.
कॅापी शॅापमध्ये पुस्तके ठेवली पाहिजेत
परदेशात किती चांगले ग्रंथालय उभी केली आहे. आपल्याकडे का तसे होत नाही. परदेशातील बुक शॅापमध्ये बसून वाचायला मिळते. आपल्याकडे हल्ली कॅापी शॅाप उघडली जात आहेत. तिथे पुस्तकेसुध्दा ठेवली पाहिजेत. म्हणजे कॅापी घेत वाचता येईल असे राज ठाकरे म्हणाले. आपल्याकडे वातावरण चांगले का नाही. कारण सभोतालचं वातावरण चांगले हवे. ते नसल्यानेच आपली मुलं परदेशी जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
'पक्ष बांधणीच्या आड कुणी आला तर त्याला तुडवा अन् पुढे व्हा, मी वकिलांची फौज उभी करतो' : राज ठाकरे