एक्स्प्लोर

Maratha Reservation : 50 टक्क्यांच्यावर आरक्षणासाठी राज्याला अपवादात्मक स्थिती सिद्ध करावी लागणार : खासदार संभाजीराजे

अपवादात्मक परिस्थिती आहे की, नाही. हे राज्य सरकार ठरवू शकतं. पण घटनेत काही बदल असतील तर ते राज्य सरकार करु शकत नाही. हे बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात, असं संभाजीराजे म्हणाले.

मुंबई : राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी, यासाठी आपण उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. जर ती संधी, ती परवानगी दिली गेली, तर आपण राज्यसभेत आपले मुद्दे मांडू, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, काल संसदेत आरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं, त्यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते. यावेळी त्यांनी 50 टक्के आरक्षणाच्या मार्यादेसंदर्भात भाष्य करताना 50 टक्क्यांची मर्यादा उठवल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले की, "राज्याचा अधिकार काय असतो? तर अपवादात्मक परिस्थिती आहे की, नाही. हे राज्य सरकार ठरवू शकतं. पण घटनेत काही बदल असतील तर ते राज्य सरकार करु शकत नाही. हे बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण 50 टक्के पुढे नेताना ते केंद्र सरकारनेच न्यावं राज्याच्या शिफारशीवर." 

आरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज ते राज्यसभेत पटलावर ठेवलं जाणार आहे. अशातच आज तुम्ही राज्यसभेत बोलणार का? असं विचारल्यावर संभाजीराजे म्हणाले की, "मला इतकंच माहीती आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये पहिलं आरक्षण दिलं. या आरक्षणात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटित केलं. मी 2007 पासून लढा देतोय, ते आजपर्यंत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरु आहे. आज राज्यसभेत बोलण्यासंदर्भात मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. आता त्यांनी ठरवायचं आहे की, त्यांनी मला बोलू द्यायचं की, नाही. कारण मी स्पष्ट बोलतो. माझ्या स्पष्ट बोलण्यानं त्यांना त्रास होत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझी भूमिका स्पष्ट बोलण्याचीच राहिल. मला विश्वास आहे, ते मला बोलायला देतील. पण अद्याप मला काहीच निरोप आलेला नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा, मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार?

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget