एक्स्प्लोर

ठाकरे गटाचं एक पाऊल पुढे, थेट राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी

शिवसेना ठाकरे गटाने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांची भेट मागितली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे.

मुंबई मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली आता मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)  जन की बात ऐकावी असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुनावलं. त्यानंतर  मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या  मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांची भेट मागितली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात  विशेष अधिवेशन बोलवण्याच्या  मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी  राष्ट्रपतींना पत्र लिहून  पाच किंवा सहा नोव्हेंबरला  भेटीची वेळ मागितली आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू  हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत.  


ठाकरे गटाचं एक पाऊल पुढे, थेट राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी

 मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

 मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना या बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यावर  जोरदार निशाणा साधला आहे.  मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  बोलवण्यात आलं नाही. त्यावरुन संकोचीत मनोवृत्ती दिसते, अशी टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget